इंदापूर, ता. २३ : येथील डॉ. कदम गुरुकुलमध्ये प्रतिभा आंतरशालेय इंग्रजी वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा पार पडल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, इंग्रजी विषयाची भीती जाऊन आवड निर्माण व्हावी. त्यांचे भविष्य उज्ज्वल घडावे व आदर्श पिढी निर्माण व्हावी, या हेतूने गुरुकुलचे अध्यक्ष डॉ. एल. एस. कदम आणि शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेसाठी डॉ. कदम गुरुकुल, विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर पिंपळी बारामती, सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय इंदापूर, अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती, व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल कळंब, एस. बी. पाटील पब्लिक स्कूल वनगळी, आर्या पब्लिक स्कूल टेंभुर्णी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नीलिमा साठे, सल्तनत पटेल यांनी काम पाहिले.
शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम, प्राचार्या माधुरी गोखले, उपप्राचार्य रिशी बासू यांनी विजयी आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित केले. स्पर्धा यशस्वितेसाठी इंग्रजी विभाग प्रमुख श्रीराम कवितके, शाळा व्यवस्थापक संदीप जगताप यांनी प्रयत्न केले. जया मिश्रा यांनी सूत्रसंचालन, गणेश घाडगे यांनी आभार मानले.
स्पर्धेतील विजेते- गट १ (सहावी ते आठवी) - प्रथम - स्वरा देवकाते (विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर पिंपळी, बारामती), द्वितीय - वेदांगी करे (डॉ. कदम गुरुकुल इंदापूर), तृतीय - रिशिता पाटील (अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती).
गट - २ (नववी ते दहावी) - प्रथम - श्रुती रवींद्र हगारे, द्वितीय - अँजेलिना लॉरेन्स क्रॉस (दोन्ही विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर पिंपळी, बारामती), तृतीय - अथर्व एन. दोंड (आर्या पब्लिक स्कूल टेंभुर्णी).
06338
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.