इंदापूर, ता. ५ ः राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती, घरे, जनावरे तसेच दैनंदिन उपजीविकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या संकटसमयी आपली सामाजिक जबाबदारी जपत इंदापूर नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला असून, आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुरूप नगरपरिषदेकडून जमा केलेल्या वेतनाचा निधी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला.
नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, कार्यालयीन अधिकारी स्वप्नील हाके, नोडल अधिकारी रश्मी बारस्कर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
नगरपरिषदेच्या या सामाजिक बांधिलकीचे व एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल कृषिमंत्री भरणे यांनी नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानत अशा प्रकारे स्थानिक पातळीवरून पुढाकार घेतल्यास पूरग्रस्तांना दिलासा देणे अधिक सोपे होते आणि प्रशासनाच्या कामाला हातभार लागत असल्याचे सांगितले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, अशोक इजगुडे, दीपक जाधव, पोपट शिंदे, बाळासाहेब ढवळे, गजानन गवळी, अनिकेत वाघ, अमर गाडे, स्वप्नील राऊत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शहरातील नगरपरिषदेच्या वतीने आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम आलेल्या श्री नरसिंह प्रासादिक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आलेली बक्षिसाची रक्कम पूरग्रस्तांसाठी कृषिमंत्री भरणे यांच्याकडे सुपूर्द केली.
06404
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.