संतोष आटोळे : सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता. १९ : नगरपरिषदेच्या निवडणुकांची घोषणा होताच उमेदवारांकडून कागदपत्रांसाठी झालेल्या धावपळीने नगरपरिषद प्रशासनाला अनपेक्षितपणे आर्थिक बळ मिळाले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे विविध दाखले, करपावत्या आणि मालमत्ता संबंधित कागदपत्रांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा थेट परिणाम कर वसुलीवर झाला आहे. केवळ दहा दिवसांतच विक्रमी करवसुली झाली आहे. त्यामुळे या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर वसुलीच्या दृष्टीने फायद्याच्या ठरल्या आहेत. त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका केवळ लोकशाहीचे पर्व नसून, आर्थिक बळ देणारा सर्वात प्रभावी कालावधी ठरत असल्याचे यंदाही स्पष्ट झाले आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांना आवश्यक असणारे कर थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता नोंदणी माहिती,
पाणीपट्टी व घरपट्टी पावत्या, विविध ना हरकत दाखले, अशी विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी प्रथम कर भरावा लागतो. त्यामुळे गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ नगरपरिषदेमध्ये उमेदवारांसोबतच समर्थकांचीही मोठी गर्दी दिसत होती.
इंदापुरात नगराध्यक्षपदासाठी १४ अर्ज, तर नगरसेवकपदासाठी तब्बल १६९ अर्ज दाखल झाले. त्यासाठी ७ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या १० दिवसांच्या कालावधीत ६२ लाख ८६ हजार ७२८ रुपये थकीत कर वसुली, तर २१ लाख १ हजार ४९ रुपये चालूची वसुली, असे एकूण ८३ लाख ८७ हजार ७७७ रुपये वसूल झाले.
दरवर्षी करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचणी येतात; मात्र निवडणूक काळात करदात्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढतो. नगरपरिषदेसाठी ही मोठी रक्कम रस्ते दुरुस्ती, पथदिवे, पाणीपुरवठा, स्वच्छता उपक्रम यांसारख्या कामांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी कर भरून नगरपरिषदेत सहकार्य करावे.
- रमेश ढगे, मुख्याधिकारी, इंदापूर नगरपरिषद
करवसुली (रुपयांत) दृष्टीक्षेपात
नगरपालिका.....थकीत कर वसुली....चालूची वसुली...एकूण वसुली
भोर- ७ लाख ४२ हजार ९८६...८ लाख २४ हजार १०९...१५ लाख ६७ हजार ९५
सासवड- १४ लाख ४७ हजार ७१५...४३ लाख ७१ हजार ४३२...५८ लाख १९ हजार १४७
जेजुरी-
बारामती- ४९ लाख ३६ हजार २३९ (शास्ती ११ लाख ४४ हजार ८०३)...५३ लाख २२ हजार ३८१...१ कोटी १४ लाख ३ हजार ४२३
इंदापूर- ६२ लाख ८६ हजार ७२८....२१ लाख १ हजार ४९....८३ लाख ८७ हजार ७७७
जुन्नर- ८ लाख १८ हजार २२०...९ लाख ५८ हजार ३४५...१७ लाख ७६ हजार ५६५
मंचर- १५ लाख ३५ हजार ९२९...१४ लाख ५० हजार ४५१ रुपये...२९ लाख ८६ हजार ३८०
फुरसुंगी- ११ लाख ४४ हजार ५२८...२९ लाख ७५ हजार ५१३...४१ लाख २० हजार ०४१
चाकण-......................................................................४० लाख रुपये
आळंदी- ...................................................................५६ हजार २३ हजार १२९
माळेगाव-
दौंड-
शिरूर-
राजगुरुनगर-
वडगाव मावळ-
तळेगाव दाभाडे-
लोणावळा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.