पुणे

शेतकऱ्यांनो, सावधान! चोरांचा डाळिंबावर डोळा

CD

इंदापूर, ता. ९ : खोरोची (ता. इंदापूर) येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातून डाळिंबाची चोरी झाली. या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत विठ्ठल तुकाराम चव्हाण (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत खोरोची येथील त्यांच्या शेतातून, तसेच शेजारील मोहन हनुमंत बोराडे यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी डाळिंबाची चोरी केली. यामध्ये विठ्ठल चव्हाण यांचे २५० क्रेट डाळिंब (अंदाजे किंमत प्रति क्रेट ४०० रुपयांप्रमाणे ६० हजार रुपये), तर मोहन बोराडे यांचे १०० क्रेट डाळिंब (अंदाजे किंमत ४० हजार रुपये), असा एकूण १ लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचे नमूद केले आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गोसावी करीत आहेत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतात उभी पिके सुरक्षित ठेवणे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस कठीण होत असताना डाळिंबाच्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून चोरट्यांचा लवकरच शोध लावावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh : कामगार, शेतकरी संघटनांकडून उद्या भारत बंद ; बँक, शाळा, महाविद्यालये अन् बाजारपेठा सुरू राहणार का?

T20 World Cup Super 8s Scenario : अफगाणिस्तानने थरारक लढतीत आफ्रिकेचा घाम काढला, पण सामना गमावला; आता सुपर ८ मध्ये कसे पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

Malvan ZP : ठाकरे शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ; मालवण तालुका हातून निसटला, युतीने मिळविली निर्विवाद सत्ता

लिव्हर ट्रान्सप्लांट टाळायचंय? आयुर्वेदात आहे यकृत रक्षणाची ताकद, केवळ मद्यपानच नाही 'या' चुका ठरतात कारणीभूत

Life Numerology : 'या' महिन्यात जन्मलेले लोक असतात दीर्घायुषी; किती शारीरिक त्रास होऊदे, तरीही जास्त वर्षे जगतातच

SCROLL FOR NEXT