पुणे

इंदापुरात भरणे विरुद्ध तिघांची आघाडी?

CD

संतोष आटोळे : सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता. १३ : इंदापूर तालुक्यात यंदा जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली आहे. त्याचवेळी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील प्रवीण माने व प्रदीप गारटकर यांनी एकत्र येत स्थापन केलेली कृष्णा भीमा विकास आघाडी, अशी लढत होणार का? याकडे नजरा लागल्या आहेत.
इंदापूर तालुक्यासाठी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेचे सात गट आणि पंचायत समितीचे चौदा गण होते. त्यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, तर पंचायत समितीचे ६ सदस्य आणि तत्कालीन काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे ३ आणि पंचायत समितीचे ९ सदस्य निवडून येत सत्ता मिळवली होती. आता मात्र नव्या रचनेनुसार जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली आहे. कृषिमंत्री भरणे यांनी पंचायत समितीवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सुरवातीला भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला. त्यानंतर इंदापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपचे प्रवीण माने आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले प्रदीप गारटकर यांच्याबरोबर एकत्र येत कृष्णा- भीमा आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. त्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठीही आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे यंदा पंचायत समितीवर सत्ता राखण्यासाठी कृष्णा भीमा विकास आघाडी कायम राहणार की वेगवेगळे लढणार, हे पाहावे लागणार आहे.
पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वालचंदनगर, सणसर आणि लासुर्णे या गणांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे.

इंदापूर तालुका जिल्हा परिषद गट व आरक्षण : भिगवण- शेटफळगढे (सर्वसाधारण महिला), पळसदेव- बिजवडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), माळवाडी- वडापुरी गट (सर्वसाधारण), निमगाव केतकी- शेळगाव गट (सर्वसाधारण महिला), बोरी- वालचंदनगर गट (अनुसूचित जाती महिला), लासुर्णे- सणसर गट (अनुसूचित जाती महिला), काटी- लाखेवाडी गट (सर्वसाधारण), बावडा- लुमेवाडी (सर्वसाधारण महिला).

इंदापूर पंचायत समिती गण व आरक्षण : भिगवण : सर्वसाधारण महिला, शेटफळगढे : सर्वसाधारण, पळसदेव : सर्वसाधारण महिला बिजवडी : नागरिकांचा मागास प्रवर्ग, माळवाडी : सर्वसाधारण महिला, वडापुरी : सर्वसाधारण महिला, निमगाव केतकी : नागरिकांचा मागास प्रवर्ग, शेळगाव : सर्वसाधारण, बोरी : सर्वसाधारण, वालचंदनगर : अनुसूचित जाती महिला, लासुर्णे : अनुसूचित जाती, सणसर : अनुसूचित जाती महिला, काटी : सर्वसाधारण, लाखेवाडी : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बावडा : नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला
लुमेवाडी : सर्वसाधारण.

जिल्हा परिषद व पंचायत समिती पक्षीय बलाबल (२०१७)
जिल्हा परिषद- राष्ट्रवादी काँग्रेस ४, काँग्रेस ३
पंचायत समिती- काँग्रेस ८, राष्ट्रवादी काँग्रेस ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : "होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Devendra Fadnavis : "अजित दादांनी शब्द पाळला नाही"; पुण्याच्या मैत्रिपूर्ण लढतीवरून देवेंद्र फडणवीसांची उघड नाराजी!

मोठी बातमी! प्रचार तोफा थंडावताच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा, कारण काय?

Thane News: ठाणे पालिका निवडणूक यंत्रणा सज्ज! १६ लाख मतदार बजावणार हक्क; दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

SCROLL FOR NEXT