पुणे

इंदापुरात भिगवणची पहिली, बावडा गटाची शेवटी मोजणी

CD

इंदापूर, ता. ८ : जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी शनिवारी मतदान झाले. यामध्ये ६७.६९ टक्के मतदान झाले. त्यानुरूप जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी ४१ उमेदवारांचे व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ७२ अशा एकूण ११३ उमेदवारांचे राजकीय भविष्य मतपेटीत बंद झाले. मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.
इंदापूर शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे सोमवारी (ता. ९) मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे
मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असून, एकूण १४ मतमोजणी टेबल, तसेच पोस्टल बॅलेटसाठी २ स्वतंत्र टेबल, अशा एकूण १६ टेबलची व्यवस्था केली आहे. मतमोजणी प्रक्रिया अनुक्रमांकानुसार राबविण्यात येणार असून, सर्वप्रथम भिगवण जिल्हा परिषद गट आणि त्या अंतर्गत येणाऱ्या भिगवण व शेटफळगढे पंचायत समिती गणांची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील अनुक्रमांकानुसार
पळसदेव- बिजवडी, माळवाडी- वडापुरी, निमगाव केतकी- शेळगाव, बोरी- वालचंदनगर, लासुर्णे- सणसर, काटी- लाखेवाडी आणि शेवटी बावडा- लुमेवाडी या जिल्हा परिषद गट व त्यामधील पंचायत समिती गणांची क्रमाने मतमोजणी सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सलमान खानची RSS च्या कार्यक्रमाला हजेरी, एका कृतीमुळे वेधलं सगळ्यांचं लक्ष, viral video

Accident: गाडीला पोलिसांची नेमप्लेट, चालक मद्यधुंद अवस्थेत, अनेक वाहनांना उडवलं अन्...; नवी मुंबईतील थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, आता 'या' तारखेला होणार प्रदर्शित !

Latest Marathi News Live Update : टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी कोलकाता विमानतळावर दाखल

Chocolate Day 2026: 'चॉकलेट डे' ला गोड सरप्राईज! घरीच तयार करा चवदार चॉकलेट केक, पाहा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT