जेजुरी, ता. २६ ः जेजुरी शहर भाजपचे माजी अध्यक्ष गणेश भोसले यांनी शहरातील सातशे महिलांना अत्यावश्यक साहित्याचे किट वाटप केले. भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप पुणे जिल्हा भटक्या विमुक्त जाती-जमाती अध्यक्ष रवींद्र खोमणे, चंद्रकांत जगताप, सागर खोमणे, सोमनाथ मदने, सचिन कापडे,
अर्चना बोरकर, संगीता बोरडे, रंजना खोमणे, चैत्राली कांबळे, विजया भोसले, सरिता मोतीकर, विद्या कुदळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप माजी शहराध्यक्ष गणेश भोसले हे अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतात. गरजू महिलांना अत्यावश्यक वस्तूंचे किट वाटप कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. सातशे महिलांना याचा आधार झाला आहे. ‘‘गरजू महिलांना व्यावसायाच्या व रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,’’ असे भोसले यांनी यावेळी सांगितले.