पुणे

जेजुरीतील चिंचेच्या बाग परिसराची स्वच्छता

CD

जेजुरी, ता. २५ : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत ‘एक दिवस-एक तास-एक साथ’ यानुसार जेजुरी नगर परिषद व जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी यांच्या वतीने चिंचेची बाग येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. चिंचेच्या बागेत नुकत्याच झालेल्या पावसाने या परिसरात गवत वाढले होते. केरकचराही जागोजागी होता. त्यामुळे या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत जिजामाता प्राथमिक शाळा व विद्यालयातील ३०० विद्यार्थी व जेजुरी नगरपरिषदेतील कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व रॅलीद्वारे पटवून दिले. तसेच यावेळी सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे नियोजन नगरपरिषदेचे शहर समन्वयक सुदर्शन काळेल, जिजामाता विद्यालयाचे समन्वयक प्रल्हाद गिरमे यांनी केले. या वेळी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे, पर्यवेक्षिका लीना पायगुडे, कुलदीप साळवे, राजेंद्र ताम्हाणे, सुनीता शिंदे, अमृता कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tuljabhavani Temple Trust: पूरग्रस्तांच्या मदतीला धावली तुळजामाता; संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देणार

Asia Cup Final: अंतिम सामन्यात गोंधळ नको! आता अश्लील हावभाव केलेत तर थेट...; भारत-पाक रणसंग्रामापूर्वी दुबईत कडक नियम लागू

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल तलाव ओव्हर फ्लो

Sugar Cut Down: महिनाभर साखरच खाल्ली नाही तर शरीरात काय बदल दिसून येतात? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Amal Mahadevrao Mahadik : 'महाडिकांमुळे राजाराम कारखाना कर्जबाजारी', सतेज पाटील गटाच्या आघाडीकडून आरोप

SCROLL FOR NEXT