जेजुरी, ता. १५ : पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतदानाच्या धामधुमीत गुरुवारी (ता. १५) जेजुरी (ता. पुरंदर) येथील दोन हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने बोगस मतदार ठेवण्यात आल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष शेखर वढणे व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबाते यांनी केला.
या घटनेची माहिती पसरताच परिसरात मोठी गर्दी जमली व काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर व जेजुरीचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ उपाययोजना केल्या. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना जेजुरी पोलिस ठाण्याच्या आवारात बोलावले. यावेळी पोलिस व भाजप
कार्यकर्त्यांमध्ये काही काळ शाब्दिक वाद झाला. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील कारवाई सुरू केली.
दरम्यान, यावेळी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर संबंधित गाड्यांची तपासणी केली असता यातील स्कार्पिओ वाहनाच्या डिकीमध्ये मतदार याद्या, मतदान ओळखपत्र, मतदार स्लिपा आदी साहित्य आढळून आले. भाजपच्या कार्यकर्त्यांना चारचाकी चालकांशी याबाबत अधिकची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता चारचाकी चालकांनी वाहनासह पलायन केले, तर काही चालक गाड्या जागेवर सोडून पळून गेले.
याबाबत लंबाते यांनी सांगितले की, सकाळी सुमारे अकराच्या सुमारास जेजुरी येथील एका हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष आढळून आले. हे सर्व जण मतदानाच्या उद्देशाने थांबवण्यात आल्याचा संशय असून, संबंधित हॉटेल परिसरात ‘महानगरपालिका निवडणूक २०२६ पिंपरी चिंचवड पोलिस अधिग्रहण वाहन’ असा मजकूर असलेल्या बस, तसेच अनेक चारचाकी वाहने उभी
असल्याचे दिसून आले. या संबंधित वाहनांचे छायाचित्रण केले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष वढणे, सचिन लंबाते, अलका शिंदे, जेजुरी शहराध्यक्ष सचिन पेशवे, गणेश भोसले, अनिकेत
भालेराव, कल्पेश सूर्यवंशी उपस्थित होते.
दरम्यान, सदर महिलांची विचारपूस केली असता त्यांनी जेजुरी देवदर्शनाला आलो असल्याचे जेजुरीचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.