पुणे

पुरंदरमधील शाळांचे सामाजिक अंकेक्षण सुरू

CD

जेजुरी, ता. १३ ः केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांना देण्यात आलेल्या अनुदानाचा विनियोग नियोजनबद्ध व योग्य प्रकारे झाला आहे का, तसेच कोणत्या बाबींमध्ये कमतरता आहेत, याचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी पुरंदर तालुक्यातील प्रत्येक शाळेचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) सुरू करण्यात आले आहे.
या संदर्भात पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील भौतिक सुविधा, स्वच्छता व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना तसेच इतर मूलभूत सोयीसुविधांची अचूक व पारदर्शक नोंद केली जात आहे. पुरंदर तालुक्यातील सर्व शाळांचे पंधरा दिवसात अंकेक्षण पूर्ण करणार आहेत. प्रत्येक केंद्रात दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून शाळेवर जाऊन ते प्रत्यक्ष नोंद घेत आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलसर येथे नुकतीच सामाजिक अंकेक्षणाची पाहणी करण्यात आली. या वेळी रेखा सहारे व सोनाली मुन यांनी मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन माहिती नोंदविली. मुख्याध्यापक भीमराव कदम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल जगताप यांनी आवश्यक कागदपत्रे व सुविधांची माहिती दिली.
शाळेतील स्वच्छ परिसर, शिस्तबद्ध वातावरण व उपलब्ध भौतिक सुविधा समाधानकारक असल्याचे पाहून रेखा सहारे व सोनाली मुन यांनी समाधान व्यक्त केले. अंकेक्षण प्रक्रियेत वर्गखोल्या, पाणीपुरवठा, किचन शेड, खेळाचे मैदान, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह, हँडवॉश स्टेशन, वॉल कंपाउंड आदी सुविधांची माहिती व छायाचित्रे मोबाइल ॲपमध्ये अपलोड केली जात आहेत. ज्या ठिकाणी सुविधा अपूर्ण किंवा अनुपलब्ध आहेत, त्यांची नोंद ‘त्रुटी व कमतरता अहवाल’ (डिफिशियन्सी रिपोर्ट) मध्ये करण्यात येत आहे.
या सर्वेक्षणासाठी ६० निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, प्रत्येक शाळेत दोन निरीक्षक दोन दिवस मुक्कामी थांबून सविस्तर माहिती नोंदवत असल्याची माहिती केंद्रप्रमुख जितेंद्र कुंजीर यांनी दिली.
तालुक्यातील सर्व शाळांचे अंकेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्रुटी व कमतरतांबाबत सामूहिक सार्वजनिक सुनावणी आयोजित करण्यात येणार आहे. शाळांनी पारदर्शक व अचूक माहिती सादर करावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे शाळांमधील अपूर्ण व कमी असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होईल, अशी माहिती पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर व संदीप कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs ZIM : झिम्बाब्वेचा खळबळजनक विजय! ऑस्ट्रेलियाला १९ वर्षानंतर नमवले; सुपर कॅच, भन्नाट गोलंदाजी अन् सुरेख फलंदाजी...

Valentine's Day Special: आर्थिक सुसंवाद - प्रत्येक जोडप्याने आवर्जून करायलाच हव्यात अशा ५ गोष्टी

T20 World Cup 2026 : MS Dhoni मुळे बदललं पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकचं आयुष्य; अनोख्या बॉलिंग अ‍ॅक्शनमुळे आहे चर्चेत!

Viral Video : अंगणात फिरणाऱ्या महाकाय अजगरावर बसली मुलगी, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

T20 World Cup: नोकरी सांभाळत स्वप्न जपलं… पिझ्झा विकणाऱ्या कृष्णने वानखेडेवर रचला इतिहास, दोन्ही बाजूंनी चेंडू फिरवण्याची कला

SCROLL FOR NEXT