पुणे

केंद्रप्रमुख ऐवजी आता समूह साधन केंद्र समन्वयक

CD

जुन्नर, ता. २८ : राज्यातील चार हजार ८६० केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच केंद्र व केंद्रप्रमुख व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार केंद्रीय प्राथमिक शाळांना समूह साधन केंद्र शाळा, केंद्राला समूह साधन केंद्र तर केंद्रप्रमुखांचे ‘समूह साधन केंद्र समन्वयक’ असे नामकरण करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
नवीन शासन निर्णयातील तरतुदींनुसार, समूह साधन केंद्र समन्वयकांचे अधिकार, कार्य व जबाबदारी स्पष्ट झाली आहे. शैक्षणिक व प्रशासकीय सनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने केंद्रप्रमुखांच्या अधिकाराविषयी असणारा संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे.
समूह साधन केंद्र समन्वयकांस शिक्षकांना अध्यापन पद्धती सुधारण्यासाठी मदत करणे, शिक्षकांचे प्रशिक्षण, बैठका व कार्यशाळा आयोजित करणे, शाळांना नियमित भेटी देऊन अध्यापन-अभ्यास प्रक्रियेचे अवलोकन करणे आदी बाबी करावयाच्या असून शाळा भेटीत प्रत्यक्ष अध्यापन करावे लागणार आहे. समूह साधन केंद्राला शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य, संदर्भ पुस्तके व माहिती तंत्रज्ञानाचे साहित्य उपलब्ध केले जाणार आहे.

नवीन शासन निर्णयातील तरतुदीनुसार समूह साधन केंद्र समन्वयकांचे कार्य, जबाबदारी व अधिकार यात अधिक स्पष्टता आली आहे. केंद्र प्रमुखांना आता अधिक प्रभावीरित्या आपली जबाबदारी पार पाडता येणार आहे.
- बाळासाहेब लांघी, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

Pune Airport Traffic Update : विमानतळ परिसरात वाहतूक बदल; दोन मार्गांवर एकेरी वाहतूक लागू!

Pune Election : दुबार नावे; चुकीची नोंदणी आणि त्रुटींचा भडिमार; मतदार यादीवर ९ हजार हरकतींचा पाऊस!

Ahmedabad Sports Hub: मोठ्या क्रीडा स्पर्धा दिल्ली-मुंबईऐवजी अहमदाबादला का होतात? हे शहर क्रीडा केंद्र कसे बनले? जाणून घ्या कारण...

Talegaon Election : तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी ५०० हून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त!

SCROLL FOR NEXT