पुणे

गोद्रेतील ग्रामसभेत माती विक्रीस बंदी

CD

जुन्नर, ता.२८ : गोद्रे (ता.जुन्नर) येथील ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीतील शेतजमिनीतील माती विक्रीस बंदी, हटकेश्वर देवस्थानचा विकास आराखडा, पर्यावरणाचे रक्षणासाठी उपाययोजना, आरोग्य विषयक सोयी सुविधा तसेच अंतर्गत रस्ते, केटी व सिमेंट बंधारे बांधणे आदी विषयांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
सरपंच अनिता रेंगडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२६) ग्रामसभा झाली. यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. कृषी विभागाच्या वतीने मोरे यांनी कृषी योजनांची माहिती दिली. ग्रामसभेची सूचना देऊनही उपस्थित नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत वरिष्ठांना कळविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सजग सेवानिवृत्ती कर्मचारी सेवा संघाच्या वतीने विविध विकास कामांबाबत विषय मांडले.
तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी किसन उतळे यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी धनंजय रेंगडे व उपाध्यक्षपदी सुषमा मुठे यांची निवड करण्यात आली. यावेळी स्वयंचलित हवामान यंत्र बसविण्यासाठी नामदेव रेंगडे यांनी विना मोबदला अर्धा गुंठा जमीन दिली.

09061

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT