पुणे

जुन्नरमध्ये सहा टन निर्माल्याचे कंपोस्ट खत करणार

CD

जुन्नर, ता.९ : जुन्नर नगरपालिकेने माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२५ अंतर्गत गणेशोत्सवाच्या काळात राबविलेल्या निर्माल्य संकलनाच्या उपक्रमास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. १० दिवसांत जमा झालेल्या सहा टन निर्माल्याचे कंपोस्ट खत तयार करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी चरण कोल्हे व आरोग्य प्रमुख ज्ञानेश्वर गुणवरे यांनी सांगितले.
गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नगरपालिकेमार्फत कुकडी नदीवरील सर्व घाटांची स्वच्छता करण्यात आली. कुकडी नदी घाटावर पाच ठिकाणी गणेश विसर्जन केले जाते .येथे सहा निर्माल्य कलशात निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केली होती तसेच शहरात स्वतंत्र वाहनातून दररोज निर्माल्य संकलन करण्यात येत होते. दहा दिवसांत एकूण चार ट्रॉली निर्माल्य जमा झाले. या निर्माल्याचे नगरपालिकेच्या कचरा डेपोत कंपोस्ट तयार करण्यात येणार आहे. यातून तयार झालेले कंपोस्ट खत नगरपालिकेने लावलेल्या झाडांना घालण्यात येणार आहे.
विसर्जनाच्या ठिकाणी भाविकांसाठी सेल्फी पॉइंट देखील करण्यात आला होता.त्यात भाविक फोटो काढत होते. गणेश उत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत पूजेसाठी वापरलेले हार, फुले, दूर्वा, केळीचे खुंट आदी निर्माल्य रूपाने मोठ्या प्रमाणात साचत असते. गणेश विसर्जन करताना भाविक निर्माल्य नदीपात्रात टाकतात. त्यामुळे नदीतील पाण्याचे प्रदूषण वाढते. गणेश विसर्जनासाठी भास्कर घाट येथे केलेल्या कृत्रिम हौदात गणेश विसर्जन करून नागरिकांनी प्रतिसाद दिला. नदीतील जलप्रदूषण टाळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असल्याचे गुणवरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Winter Session : नोकऱ्या काढल्या, तरुण पेटले! अधिवेशनात सरकारची कोंडी! तरुणांचे चॉकलेट आंदोलन अन् लोटांगणाने नागपूर हादरलं

Nashik Municipal Election : नाशिक महापालिका निवडणूक: महायुती निश्चित, पण राष्ट्रवादी काँग्रेस 'आऊट'! शिंदे गटाला अवघ्या २२ जागा मिळण्याची शक्यता

Christmas 2025: यंदाचा ख्रिसमस आहे एकदम खास! जाणून घ्या शतकातून एकदाच येणाऱ्या '25/12/25' तारीखेची खासियत

Latest Marathi News Live Update: पगार रखडल्याने नागपुरात शिक्षकांचं आंदोलन

Nashik MNGL Gas Leak : मोठा स्फोट टळला! अंबड, फडोळ मळा परिसरात गॅस गळती; प्रशासकीय अधिकारी वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी

SCROLL FOR NEXT