पुणे

महसूल विभागाचे चार दिवसांपासून कामकाज ठप्प

CD

जुन्नर, ता.२६ : जुन्नर तालुका महसूल सेवक (कोतवाल) संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी (ता. २३) काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.
महसूल सेवकांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी दीर्घकाळ प्रलंबित आहे.या मागणी संदर्भात विदर्भ महसूल संघटना तसेच महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना यांनी बुधवारी (ता.३) महसूलमंत्री यांना निवेदन दिले होते. मात्र, कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संपाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. महसूल सेवक हे महसूल प्रशासनातील कणा मानले जातात. शेतकऱ्यांच्या जमिनींचे ताबापत्र, ई-पीक पाहणी, नैसर्गिक आपत्ती, सातबारा, भूसंपादन, ग्रामपंचायत व निवडणुका तसेच सर्व शासकीय अधिकाऱ्यांना साहाय्य करणे अशा महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांचा थेट सहभाग असतो. त्यांना अद्याप कायमस्वरूपी सेवेत न घेता अस्थिरतेत ठेवण्यात आले आहे. निवासी नायब तहसीलदार सारिका रासकर यांना मंगळवारी (ता.२३) निवेदन देण्यात आले. यावेळी महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष लुमाजी घोडे, सचिव किरण म्हसकर, रेखा मरभळ, प्रकाश सोनवणे, सुरेश फोडसे, नितीन लोहटे व श्याम वाव्हळ यांनी शासनाने मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : कागल मध्ये मुश्रीफ गटाच्या उमेदवारासाठी शिंदे गटाची माघार

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

SCROLL FOR NEXT