जुन्नर, ता.१४ : जुन्नर नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सोमवार (ता.१३) पर्यंत ६३५ हरकती दाखल झाल्या आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिल्याने यात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
नगर परिषदेच्या मतदार यादीत काही नावे दोनदा तर काही नावे तीनदा आली आहेत ही संख्या मोठी आहे. मृत्यू पावलेल्या मतदारांची नावे कमी करण्यात आली नाहीत. मतदार यादीत नगर परिषद क्षेत्राबाहेरील मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. एका प्रभागात दुसऱ्या प्रभागातील मतदार समाविष्ट करण्यात आले असल्याचे देखील सांगण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी शुक्रवार (ता.१७) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून ३१आक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादी तयार करताना काही तांत्रिक अडचणी असल्यास ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात यावा आणि अत्यंत तत्कालिक कारण असल्यास दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी सांगितले.
या वेबसाइटवर मतदार यादी उपलब्ध
प्रारूप मतदार यादी ही जुन्नर नगरपरिषदेची वेबसाइट: https://mahaulb.in/MahaULB/home/ulblist/viewmore व जिल्हाधिकारी पुणे यांचे संकेतस्थळ : http://pune.gov.in तसेच जुन्नर नगर परिषद कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या वेबसाइटवरून प्रभागनिहाय मतदार यादी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रारूप मतदार यादीनुसार जुन्नर शहरात एकूण २४ हजार ०२३ मतदार असून त्यामध्ये १२ हजार ०८१ पुरुष तर ११ हजार ९६२ महिला मतदार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.