पुणे

खळद सोसायटीच्या अध्यक्षपदी कामथे

CD

खळद, ता. २४ : खळद (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास बबन कामथे यांची तर उपाध्यक्षपदी रवींद्र निवृत्ती फुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्ष चंद्रकांत कामथे व उपाध्यक्ष महेंद्र रासकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक सहकारी अधिकारी ए. एस. बागवान यांनी काम पाहिले. तर सचिव संतोष राऊत यांनी त्यांना सहकार्य केले.

या वेळी संचालक भगवान कांबळे, संजय कामथे, सचिन कादबाने, विकास कामथे, राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर कामथे, भारती कामथे, जयराम इभाड, भैरवनाथ कामथे आदी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकारांचा शंभू महादेव मंदिरात सत्कार करण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील माजी सभापती देवदास कामथे व एखतपूर-मुंजवडीचे माजी सरपंच महादेव टिळेकर यांची नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.

विलास कामथे, रवींद्र फुले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT