पुणे

अतिवृष्टी, अवकाळीमुळे पिके वाया

CD

योगेश कामथेः सकाळ वृत्तसेवा
खळद, ता. २ : पुरंदर तालुक्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर शासनाकडून मिळालेली, मिळणारी मदत अतिशय कमी असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे सीताफळ, पपई, पेरू, अंजीर, आंबा आदी फळबागांचे, तसेच, सोयाबीन, मका, भाजीपाला, भुईमूग, बाजरी, ज्वारी, फुले, कांदा, टोमॅटो, घेवडा यासारख्या बागायती- जिरायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्यामार्फत संयुक्तरीत्या पंचनाम्याचे काम सुरू असून, सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पंचनाम्याच्या माध्यमातून जिराईत, बागायत व फळपिके अशा ८४५६ शेतकऱ्यांचे, २७६१ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन सुमारे चार कोटी २९ लाख ३६ हजार ८५० रुपये रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली.

ऑक्टोबर महिन्यातही झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सध्या सुरू असून, या पंचनाम्यासाठी प्रशासनाकडून दिलेली मुदत अतिशय कमी आहे, तर एका अधिकाऱ्याकडे चार ते पाच पाच गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने सर्व ठिकाणी अधिकाऱ्यांना पोहोचणे शक्य होत नाही. यामुळे अनेक शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहत असल्याचे पहावयास मिळत आहे. यावेळी बाधित शेतकऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. तरी शासनाकडून पंचनाम्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

माझ्या शेतात कोबी आहे. त्यामध्ये आजही पाणी आहे. यामुळे कोबीचे पीक तर वाया गेलेच, मात्र हे पाणी आणखी दोन- तीन महिने आटत नाही. यामुळे पुढचे पीक घेणे ही अवघड आहे. माझ्याकडे साधा मोबाईल असल्यामुळे मला कसलाच मेसेज येत नाही. पंचनाम्याचा फॉर्म तलाठ्याकडे भरून द्यायचा आहे, असे कळाले पण आमच्याकडे कोणी आले नाही. त्यामुळे आमचा पंचनामा झाला नाही. नेहमीप्रमाणे मी महा-ई-सेवा केंद्रात जाऊन चौकशी केली, तर मुदत संपल्याचे सांगण्यात आले.
- नारायण शिवरकर, बाधित शेतकरी, शिवरी

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. शासनाकडून जरी पंचनामे सुरू असले तरी नुकसानीच्या प्रमाणात मिळणारी रक्कम ही अतिशय तोकडी आहे. यातून शेतकरी सावरणे अवघड आहे. शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी शासनाने सर्व बँकांचे कर्ज माफ करावेत व हे करताना कोणत्याही अटी शर्ती नसाव्यात.
- संजय चौरे, बाधित शेतकरी, वाळुंज

शासनाच्या निर्देशानुसार बाधित सर्व पिकांचे पंचनामे सुरू असून, सप्टेंबरपर्यंत झालेल्या पंचनाम्यांचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. काहींच्या तांत्रिक अडचणी असतील त्यांचे पैसे प्रलंबित असतील तर आताही पंचनामे सुरू असून, याची आकडेवारी अद्याप आली नाही. त्यांनाही नियमानुसार मदत मिळेल.
- श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, पुरंदर


कृषी मंडल निहाय माहिती (सप्टेंबर २०२५)
मंडल एकूण क्षेत्र हे. बाधित क्षेत्र हे. टक्केवारी
सासवड ८१६१ ९६.९० १.१९
परिचे ३२५७ ७१७.५० २२.०३
जेजुरी १०१९९ ४९.८० ०.४९
पिसर्वे ९४३७ १८९७ २०.१०
एकूण ३१०५४ २७६१.२० ८.८९


सप्टेंबर २०२५ मदत (३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान)
प्रकार बाधित शेतकरी संख्या बाधित क्षेत्र हे. मदत
जिरायत २०४२ ४७२.३० ४०१४५५०
बागायत ६३८६ २२८६.९० ३८८७७३००
फळे २८ २ ४५०००
एकूण ८४५६ २७६१.२० ४२९३६८५०

03332

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

INDIA A SQUAD FOR ODI SERIES vs SOUTH AFRICA A : रोहित शर्मा, विराट कोहली यांचा वन डे संघात समावेश नाही; तिलक वर्माकडे नेतृत्व, तर ऋतुराज उप कर्णधार...

Mhada Lottery: पुण्यात ९० लाखांचे घर फक्त २८ लाखांत मिळणार! म्हाडाची मोठी घोषणा; अर्ज कधी आणि कसा करायचा?

Jalgaon News : जळगावकरांची प्रतीक्षा वाढली; अवकाळी पावसामुळे ई-बस आगाराचे काम रखडले, नवीन वर्षातच बससेवा सुरू होणार

SCROLL FOR NEXT