पुणे

खळदमध्ये विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

CD

खळद, ता. ११ : खळद (ता. पुरंदर) येथे फूड्स सर्विस इंडिया कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत येथील श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व कंपास बॉक्स देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रोहिणी कामथे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना फूड्स सर्विस इंडिया कंपनीचे व्यवस्थापक सचिन मोरे म्हणाले, ‘‘आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे अत्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक साहित्य हा त्यांच्या प्रगतीतील अडथळा ठरू नये, यासाठी आमच्या कंपनीने सीएसआर निधीतून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात अशा स्वरूपाचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा मानस आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये आणि आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये यासाठी समाजातील कंपन्यांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.’’
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उद्योगसमूहांचे हे पाऊल कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी ग्रामस्थ, पालकांनी व्यक्त केली.
यावेळी योगेश कामथे, माजी सरपंच भाऊसाहेब कामथे, जयदीप भट, प्रमित शहा, कैलास खंडारे, बालाजी बडगीरे, आकांक्षा कुंभारकर, चेतन कामथे, गोरख कादबाने आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका माया ताकवले, संदीप लव्हे यांनी केले, तर विद्यालयात दिलीप जगताप, प्रल्हाद कारकर, रामचंद्र कामठे, सायली गोरे, सुस्मिता चव्हाण, उत्कर्षा फुले, प्रकाश हांडे, वैजयंता मांढरे, बाळासाहेब खळदकर व बाबूराव गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे यांनी केले. सूत्रसंचालन रमेश बोरावके यांनी, तर रामचंद्र कामठे यांनी आभार मानले.

03505

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

SCROLL FOR NEXT