पुणे

''कुमंडला''वरील बंधारा भरण्याची कडूस येथील शेतकऱ्यांना प्रतीक्षा

CD

कडूस, ता.३१ : कडूस (ता.खेड) परिसरातील पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांचा पाण्याचा एकमेव आधार असलेला कुमंडला नदीवरील बंधारा अद्याप पूर्ण क्षमतेने भरला नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दमदार पावसाच्या जोरावर चासकमान धरण भरले, परंतु अजूनही कडूस येथील कुमंडला नदीवरील बंधारा पाण्याने भरला नाही. कुमंडला नदी कोहिंडे जवळच्या कुंडेश्वर डोंगरावरून उगम पावते. कुंडेश्वर डोंगर परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे, परंतु भीमाशंकर खोऱ्यातील पावसाच्या तुलनेत या परिसरातील पावसाचे प्रमाण कमी आहे. कुमंडला नदीवरील बंधाऱ्यातील पाण्यावर कडूस, गारगोटवाडी परिसरातील बहुतांश शेती अवलंबून आहे. पावसाळ्याच्या अगोदर बंधारा कोरडा झाला होता.
गेल्या आठवड्याभरातील रिमझिम पावसानंतर या बंधाऱ्यातील पाणी साठा सुमारे सुमारे सत्तर टक्क्यांपर्यंत पोचला आहे. कुमंडला नदी प्रवाही झाली आहे. नदीवरील कोहिंडे व कंदवाडी येथील पाझर तलाव भरला आहे. सध्या पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.

01094

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Security Lapse Kolhapur : गुप्तचर यंत्रणा बिनकामाची? अनोळखी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीजवळ, शेतकरी आंदोलकांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत ताफ्यावर ऊस फेकला...

अदाणी समूह RCB चा संघ खरेदी करणार? 'या' चार कंपन्याही आहेत शर्यतीत...

Latest Marathi News Live Update : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मंगळवारी होणार निर्णय

'अल्पवयीन विवाहित मुलीशी लैंगिक संबंध म्हणजे बलात्कारच!' High Court चा ऐतिहासिक निर्णय, मुस्लिम वैयक्तिक कायदा फेटाळला

हृतिक रोशनच्या एक्स पत्नी सुझानला मातृशोक ! वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT