पळसदेव, ता. ११ ः ‘‘इंदापूर तालुक्यामध्ये पळसदेव ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षांत राबविलेला विकासाभिमुख पारदर्शक कारभार हा इतर गावांच्या कार्यकारिणीसाठी आदर्शवत आहे. याशिवाय कारभाराचा मुख्य गाभा असलेल्या कर वसुलीचे प्रमाण ८२ टक्के आहे. ग्रामपंचायतीने सुमारे ५२ लाखांची करवसुली करत तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक काम केले आहे,’’ असे प्रतिपादन गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी केले.
पळसदेव ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारोप समारंभात खुडे बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते सरपंच कोमल सुभाष बनसुडे, सदस्य इंद्रायणी मोरे, जयश्री शेलार, पुष्पलता काळे, भूषण काळे, हनुमंत बनसुडे, भालचंद्र बांडे, आजिनाथ पवार, अंकुश जाधव, कैलास भोसले या सदस्यांचा व ग्रामविकास अधिकारी तुकाराम शिंदे, कर्मचारी सुनील काळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी भूषण काळे, हनुमंत बनसुडे, कैलास भोसले यांनी गेल्या पाच वर्षांतील आपल्या अनुभवांना उजाळा दिला. गावाच्या सेवेची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गावातील कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतीने नव्याने खरेदी केलेल्या घंटागाडीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास दीपक जाधव, सुभाष बनसुडे, प्रदीप काळे आदी उपस्थित होते.
पाच वर्षांत ४ सरपंच, ५ उपसरपंच
पळसदेव ग्रामपंचायतीमध्ये १५ सदस्यांची कार्यकारिणी असून, १० फेब्रुवारी २०२१ ते ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडून आलेल्या सदस्यांपैकी ४ जणांना सरपंच पदाची, तर ५ जणांना उपसरपंच पदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. इंद्रायणी सुजित मोरे, आजिनाथ भगवान पवार, अंकुश भीमराव जाधव, कोमल सुभाष बनसुडे यांनी सरपंच पद भूषविले, तर पुष्पलता राजेंद्र काळे, सोनाली मेघराज कुचेकरपाटील, कैलास दिनकर भोसले, जयश्री भीमराव शेलार, कोमल विकास शिंदे यांना उपसरपंच पदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली.
गेल्या पाच वर्षांत गावात सुमारे ५० कोटींची विकासकामे मार्गी लावण्यात यश आले आहे. गावात पक्के रस्ते, सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी बंदिस्त गटार योजना, ग्रामपंचायत इमारतीचे सुशोभीकरण, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा यांसारख्या काही महत्त्वाच्या कामांस प्राधान्य दिले. याशिवाय गावात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा, शालेय इमारतीच्या संरक्षक भिंतीची कामे, आरोग्य केंद्रात गरम पाण्याची सोय, सौर ऊर्जा यंत्रणा यांसारखी अनेक कामे मार्गी लावली.
- तुकाराम शिंदे, ग्रामविकास अधिकारी
03368
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.