पुणे

परसबागेतील ताज्याभाज्यांमुळे पौष्टीकतेला बळकटी

CD

कळस, ता. १२ : रुई (ता. इंदापूर) येथील श्री बाबीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः कष्ट करून सुंदर परसबाग फुलवली आहे. परसबागेतील ताज्या भाजीपाल्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये होत आहे. या उपक्रमामुळे त्यांच्या आहारातील पौष्टीकतेला अधिक बळकट मिळाली आहे.

पुस्तकी ज्ञानासोबतच श्रमाचे महत्त्व आणि निसर्गाशी जवळीक निर्माण करण्याच्या उद्देशाने मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील व पर्यवेक्षक धनाजी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक उस्मान मुलाणी, धनेश भोईर, शिक्षिका मीरादेवी पाटील, प्रतीक्षा पाटील यांनी परसबागेची संकल्पना अस्तित्वात आणली आहे. शाळेच्या मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांनी वांगी, मिरची, कोथिंबीर, घेवडा आणि भोपळा अशा विविध भाज्यांची लागवड केली आहे.
परसबागेतील भाज्या पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात आल्या आहेत. दररोजच्या मधल्या सुट्टीत किंवा रिकाम्या वेळेत विद्यार्थी या झाडांना पाणी देणे तसेच त्यांची निगा राखण्याचे काम आवडीने करतात. बाहेरून विकत आणलेल्या भाजीपाल्यापेक्षा स्वतःच्या हाताने पिकवलेला विषमुक्त आणि ताजा भाजीपाला जेवणात मिळत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

मुख्याध्यापक जे. एन. पाटील म्हणाले, परसबाग उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शेतीचे तंत्र समजले असे नाही, तर कष्टाचे फळ किती गोड असते याचा अनुभवही मिळाला आहे. हा उपक्रमाचे पालकांमधून कौतुक होत आहे. इतर शाळांसाठीही हा उपक्रम दिशादर्शक आहे.


03378

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajpal Yadav's Bail Denied: राजपाल यादवला न्यायालयाकडून धक्का!, जामीन नाकारल्याने तिहार तुरुंगातील मुक्काम वाढणार

Dharashiv News: ७२ लाख ८४ हजाराची अफुची झाडे जप्त,वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी संयुक्त कारवाई

Latest Marathi News Live Update : दर्यापुरात अवघ्या 7 सेकंदात जिंकली बैलगाडा शर्यत

Nashik News : "९ हजार पेन्शन द्या, अन्यथा उपोषण!"; सातपूरमध्ये पीएफ कार्यालयावर पेन्शनधारकांचा हल्लाबोल

School Punishment: छ. संभाजी नगरमधील शाळेत विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा; रबरने केस बांधले अन्...

SCROLL FOR NEXT