पुणे

नवसाला पावणारा श्री भानोबा देव

CD

पुणे जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले कुसेगाव जेमतेम ३ हजार ५०० लोक संख्या असलेले गाव. कुसेगावातील शितोळे देशमुख यांच्या कन्येचा ३५० वर्षांपूर्वी जिल्हा सातारा येथील मोहितेवाडीतील मोहित्यांच्या घरात विवाह झाला. वैवाहिक जीवन जगताना एके दिवशी नातेसंबंध बिघडले आणि त्यातून दोन नाते संबंधांचे रूपांतर वैरात झाले. भानोबा देवाच्या वडिलांचा घात केला आणि आई आपला जीव वाचवण्यासाठी धावत पळत येऊन कोयाळी येथील धनगर समाजाच्या कोळेकरांच्या वाड्यामध्ये शिरली आणि लपून बसली. पहाटे उठल्यावर त्या वाड्यातील बायकांनी तिला पोटुसी पाहिले आणि बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या. देवरुपी बाळाचा जन्म झाला. त्याचे नाव भानोबा ठेवले.

वाड्यातील कोळेकर बंधूंनी त्यांना आसरा दिला. या सात मामांनी देवाला उपजीविकेसाठी सात गाय दिल्या. दुष्काळामुळे गायांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे भानोबा देव आपल्या सवंगड्यासह गाया घेऊन मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे गेले. मंगळवेढा येथील मातंग समाजाने व रामोशी समाजाने त्या ठिकाणी गाईवरती हल्ला केला, आणि त्या गाईंचा रक्षणासाठी भानोबा देवाने युद्ध पुकारले युद्धासाठी एकूण ३६० तस्कर होते. त्यापैकी 359 तस्कर देवाने मारून टाकले परंतु, एक तस्कर की ज्याने देवाचा कपटीपणा करून घात केला. ज्यावेळेस भानोबांचे निधन झाले, त्यावेळेस मंगळवेढा येथील त्यांची कपिला नावाच्या गाईला वाचा फुटली. गाईने घरी येऊन आईला भानोबा देवाचा घात झाले सांगितले. आई गाईसह मंगळवेढ्याला पोचली. त्या ठिकाणी एकूण ३५९ मृतदेह पडलेले होते. त्यामुळे भानोबाच्या आईला भानोबा देवाचा मृत्यदेह कोणता हे ओळखणे कठीण झाले होते, त्यावेळेस आईने हाक दिली की तू जर खरच सत्यवान असेल तर तू हात वर करशील त्यानंतर भानोबा देवाच्या मृतदेहने हात वर केला. त्यानंतर मृतदेहाच्या ठिकाणी पांगराचे झाड उगवले व देवाने आईला स्वप्न दृष्टांत दिला. त्या पांगऱ्या झाडाचा मुखवटा तयार करून घरी घेऊन आल्यानंतर मामांच्या हातात दिला. आणि आईने मंगळवेढा येथे घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. दृष्टांतात देवाने सांगितले, दरवर्षी देवाचा उत्सव साजरा करा व त्या उत्साहात सर्व मातंग व रामोशी समाजाचा दरवर्षी मी सूड घेईल. माझ्या मामाच्या गावी कुसेगावच्या माझ्या मामांना घडलेला सर्व वृत्तांत सांगा आणि कुसेगावला देखील ही यात्रा उत्सव करायला सांगा, म्हणून तेरा दिवस मामाच्या कुसेगावाला देव येतो.

मंदिराचे काम हेमांडपंथी
दिवसेंदिवस भानोबाची यात्रा वाढत आहे. यात्रेसाठी अंदाजे तीन ते चार लाख भक्त महाराष्ट्रातून येतात. देवदाणव युद्ध हे प्रसिद्ध आहेच, पण नवसाला पावणारा भानोबा म्हणून देवाची ख्याती महाराष्ट्रात आहे. भानोबा देवाचे मंदिराचे काम गेली दोन वर्ष जोरदारपणे सुरू आहे. मंदिराचे संपूर्ण काम हे हेमांडपंथी पद्धतीने आहे. सात मामांची सात शिखरे तसेच प्रत्येक शिल्पावर सुंदर नक्षीकाम करत मंदिराचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT