पुणे

पाटस परिसरात विजेचा लपंडाव

CD

कानगाव, ता. १८ : पाटस (ता. दौंड) परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
पाटस आणि परिसरात दिवसातून अनेकवेळा वीज जाते. काहीवेळा ही वीज अनेक तासनतास गुल असते. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामध्ये प्रामुख्याने विजेवर चालणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. दुकानदारांचे आणि व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार ठप्प होत आहेत.
नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे (महावितरण) तक्रार करण्यासाठी संपर्क साधल्यास अधिकारी योग्य प्रतिसाद देत नाहीत किंवा तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देऊन वेळ मारून नेतात, अशा नागरिकांमधून तक्रारी होत आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील व्यावसायिक व नागरिकांकडून होत आहे.

पाटस गावातील सर्वच व्यावसायिकांचे छोटे- मोठे धंदे विजेवर अवलंबून आहेत. मात्र, गावात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. महावितरण कंपनीने देखभालीसाठी महिन्यातून एक दिवस ठरवून घ्यावा व दुरुस्तीची कामे करून घ्यावीत. अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालय टाळे ठोकावे लागेल.
- मिथुन शितोळे, व्यावसायिक, पाटस

पालखी, यात्रा उत्सवामुळे देखभालीची कामे चालू होती. तसेच, कुरकुंभ येथील मुख्यलाइन ३३ केव्हीचे काम चालू होते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत होता. मात्र, ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील काळात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल.
- काकासाहेब माळी, वीजतंत्री, पाटस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक सुरू

Viral Video: वधूच्या बाजूने वराच्या कुटुंबाला वाटली ‘सोन्याची’ बिस्किटं? व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी गोंधळात

Mahadevrao Mahadik News : आप्पा महाडिकांचा एक कॉल, गोकुळ माजी अध्यक्षांच्या पोराचा जिल्हा परिषदेत 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT