पुणे

पाटस परिसरात एअरटेलची सेवा कोलमडली

CD

कानगाव, ता. २० : पाटस (ता. दौंड) व परिसरात गुरुवारी (ता. २०) दुपारपासून एअरटेल कंपनीची सेवा कोलमडल्यामुळे हजारो ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. मोबाईलपासून ते ब्रॉड बँड पर्यंत सर्वच ठिकाणी अडथळे येत असल्याने ग्राहक वैतागले आहेत.
एअरटेल कंपनीचा मोठा ग्राहक वर्ग आहे. परंतु अचानक सेवा विस्कळित झाल्यामुळे ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. या नेटवर्क समस्यांमुळे ऑनलाइन सुविधांवर, बँकिंग सेवेवर परिणाम होत आहे. पाटस परिसरात नेटवर्क समस्या असल्यामुळे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क बंद झाला होता. यामुळे नागरिकांचे व्यवहारही ठप्प झाले. फोन पे, गूगल पे, पेटीयम यांसारखे मोबाईल बँकिंग व्यवहार करण्यासाठी नेटवर्क नसल्याने ग्राहकांचे व्यवहार खोळंबलेले दिसत आहेत. मोबाईल नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप होणे, या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
परिसरातील एअरटेल कंपनीच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिजिटल युगात, स्मार्टफोन हे नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. अनेक कामे स्मार्टफोनच्या मदतीने करता येतात. मात्र फोनला चांगला सिग्नल असूनही इंटरनेट योग्यरीत्या काम करत नाही. दरम्यान, पाटसमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे टॉवर उभारले आहेत. मात्र ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता टॉवरची संख्या कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. तर मागील काही दिवसांपासून कॉल ड्रॉप आणि रेंज प्रॉब्लेम या समस्यांमुळे एअरटेल कंपनीचे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT