पुणे

इमारतीअभावी पेरणे येथे कंटेनरमध्ये रुग्ण तपासणी

CD

शरद पाबळे
केसनंद : पेरणे (ता. हवेली) आरोग्य केंद्र सध्या केवळ १० गुंठ्यात चालवावे लागत असून प्रशस्त जागा व सुसज्ज इमारत नसल्याने अक्षरशः कंटेनरमध्ये बसून डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करावी लागते. तर प्रसूतीसाठीही सुसज्ज अशा प्रसूती कक्षाची गरज आहे.
यापूर्वी आरोग्य सेवेबाबत जिल्ह्यात आठव्या क्रमांकावर नावलौकिक मिळालेल्या पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्णांना मात्र उपचारासाठी डॉक्टरांची साडेदहा वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. तीन डॉक्टरांची नियुक्ती असलेल्या पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्रात एक डॉक्टर वाघोली येथे प्रतिनियुक्तीवर तर दुसरे डॉक्टर सोमवारी (ता.३़) आरोग्य केंद्रात आलेच नाही. सकाळी नऊ वाजल्यापासून दीड तास सुमारे ३५ पेक्षाही अधिक रुग्णांना तपासणीसाठी ताटकळत राहावे लागले. अखेर १०.३० वाजता तिसऱ्या डॉक्टर आरोग्य केंद्रात आल्यानंतर बाह्यरुग्णांची तपासणी सुरू झाली. सध्या पेरणे गावात केवळ १० गुंठे जागेत असलेल्या पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पेरणे, लोणीकंद, डोंगरगाव, बकोरी, वढू खुर्द, फुलगाव, भावडी व तुळापूर या आठ गावात आरोग्यसेवा दिली जाते. या परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे दररोज सुमारे २०० ते २५० बाह्य रुग्ण तपासणी व उपचारासाठी येतात. तर दर महिन्याला १० ते १२ इतकी प्रसूतीची संख्या आहे. मात्र प्रशस्त जागा, सुसज्ज इमारतीअभावी प्रभावी आरोग्यसेवेत अडचणी जाणवत आहेत.

बाह्यरुग्ण तपासणीची वेळच माहिती नाही
तसेच बाह्यरुग्ण तपासणीची वेळ नऊ ते एक व दुपारी तीन ते पाच आहे, हे अनेक रुग्णांना माहितीच नसल्याचे निदर्शनास आले. तर पेरणेगावापासून दूरवर राहणारे डॉक्टर साडेदहाच्या सुमारास आल्यानंतर आम्ही नियमित तपासणीसाठी येतो. मात्र वेळेत ओपीडी सुरू झाल्यास लवकर आपल्या कामावर जाता येईल, अशीही गरज रुग्णांनी व्यक्त केली.

औषधांचा पुरवठा मिळणार असल्याने सोमवारी (ता. ३) पुण्यात जावे लागले, मात्र दुसरे डॉक्टर ड्यूटीवर होते. रुग्ण सकाळी लवकर येत नसल्याचा आमचा अनुभव आहे. टोलनाक्याजवळच्या अडीच एकर जागेत नव्या आरोग्य केंद्राचे काम झाल्यानंतर रुग्णांना ऑपरेशन थिएटरसह अधिक सुसज्ज सेवा देता येतील.
- डॉ. नीलिमा इनामदार, वैद्यकीय अधिकारी

आरोग्य केंद्राला प्रशस्त जागा व सुसज्ज इमारतीसाठी अनेक दिवस जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता, त्यामुळे आरोग्य केंद्राच्या शासकीय जागेचा मार्ग मोकळा झाला असून सुसज्ज इमारतीकरिता निधी मिळाल्यानंतर लवकरच टोलनाक्याजवळच्या अडीच एकर जागेत नव्या आरोग्य केंद्राचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील आठ गावांना दर्जेदार उपचार मिळणार असून पेरणे गावातील केंद्रातही रुग्णसेवा सुरूच राहणार आहे.
- उषा वाळके, सरपंच, पेरणे


05188

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: राज्यातील सहकारी बँकेतील ‘सत्ताधीशां’ना धक्का; संचालकांचा कार्यकाळ फक्त दहा वर्षेच, बँकांचे राजकारण ढवळून निघणार!

ZP Elections 2026 Voting Live Update : परभणीच्या राणीसावरगावमध्ये मतदानावरून गदारोळ; मतदानापासून रोखल्याचा आरोप

T20 World Cup: आजोबा, वडिलांनंतर आता पुण्याचा शुभम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार; भारताविरुद्ध मैदानात उतरणार

Voting Before Wedding: मतदानाचा हक्क बजावून नवरदेवाची लग्नाकडे धाव; तांबवेतील विक्रम पाटील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेत!

Leopard Video Rescue Kolhapur : पाण्यासाठी बिबट्यांच्या बछड्यांची वणवण, विहिरीत डोकावून पाहिलं अन्; अडीच तासांनंतर वनविभागाला आलं यश

SCROLL FOR NEXT