पुणे

‘दादा मुख्यमंत्री झाल्याची बातमी ऐकायची राहिलीच’

CD

केसनंद, ता. २९ : राज्यात सहा वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषविलेल्या अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, ही अपूर्ण इच्छा आजही अनेक जुने निष्ठावंत कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करून आहे. अशी भावना अनेकदा कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अजित पवार यांच्यासमोरही व्यक्त केली होती. असाच एक भावनिक प्रसंग पेरणे (ता. हवेली) येथे घडला होता.
जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेट देण्याची परंपरा पवार घराण्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जोपासली होती. हाच पायंडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कायम ठेवला होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने पेरणे येथे आले असताना अजित पवार यांनी दिवंगत माजी सरपंच छबनराव वाघमारे यांच्या घरी आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांनी तब्बल २४ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यानच्या काळात मधुमेहामुळे छबनराव वाघमारे यांची दृष्टी गेली होती; मात्र अजित पवार यांच्या बोलण्याकडे त्यांचे लक्ष अत्यंत बारकाईने होते. याचवेळी, ‘‘दादा, अजूनही तुम्ही मुख्यमंत्री झाल्याची बातमी ऐकायची मनोमन इच्छा आहे...’’ अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त करत अजित पवार यांना शुभेच्छाही दिल्या होत्या.
हा भावनिक प्रसंग त्यावेळी ‘सकाळ’मध्येही प्रसिद्ध झाला होता. त्या बातमीचे कात्रण छबनराव वाघमारे यांचे चिरंजीव व माजी उपसरपंच प्रशांत वाघमारे यांनी ‘सकाळ’कडे पाठवत अजित पवार यांच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

Baramati Crime News : बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास; अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरटयांचा धुमाकूळ....

Latest Marathi News Union Budget 2026: गोळीबारातील गुन्हेगारांना मुंबईतील खंडणीविरोधी कक्षात आणलं

Shirur News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी; शिक्रापूर पोलिसांनी पतीला अटक

Union Budget 2026 : ​'बायोफार्मा शक्ती' उपक्रमासाठी १०,००० कोटींची तरतूद; महाराष्ट्र सरकारच्या मागणीला केंद्राचे बळ : ना. नरहरी झिरवाळ

SCROLL FOR NEXT