पुणे

तुळापूर येथे अस्थिकलशाचे विसर्जन

CD

केसनंद, ता. ३ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश मंगळवारी (ता. ३) छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची बलिदानभूमी असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे दर्शनासाठी आणण्यात आला. त्यानंतर सजवलेल्या नावेत अस्थिकलश ठेवून भीमा- भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमाच्या पाण्यात अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले.
दिवंगत अजित पवार यांचा अस्थिकलश मंगळवारी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधिस्थळापुढेही काही वेळ दर्शनासाठी ठेवण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांना दादांनी केलेल्या कामांच्या आठवणी दाटून आल्या. तसेच, राज्यातील ऐतिहासिक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी वेळोवेळी आर्थिक तरतूद करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी सातत्याने घेतलेला पुढाकार, तसेच येथील दर्जेदार कामासाठी त्यांचा स्पष्टपणा, स्मारकाच्या कामासाठी त्यांनी वक्तशीरपणाने दिलेला वेळ, अशा अनेक आठवणींनी तुळापूरकर अक्षरश: गहिवरून गेले होते.
पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, प्रवीण शिंदे, प्रदेश सरचिटणीस प्रदीप कंद, माजी तालुकाध्यक्ष लोचन शिवले, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयेश कंद, माजी सरपंच रूपेश शिवले, संपत शिवले, सरपंच गुंफा इंगळे आदींसह अनेकांनी दर्शन व श्रद्धांजली वाहिल्यानंतर अस्थिकलशाचे भीमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमात विसर्जन करण्यात आले. अप्पासाहेब जगताप यांनी सूत्रसंचालन केले.


05389

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur President’s Rule Ends: वर्षभरानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात ; युमनाम खेमचंद सिंह घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!

U19 World Cup: भारताविरुद्ध सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या दोघांची शतकं, विक्रमही नावावर अन् संघाच्या ३०० धावाही पार...

Horoscope : 150 वर्षानंतर उद्या बनतोय खास योग! 'या' 5 राशी ठरणार लकी; धनलाभ, कामातली अडचण होईल दूर, वैवाहिक जीवनाला नवे वळण

Rise of Online Education : भारतातील ऑनलाईन शिक्षणाचा उदय : एमबीए आणि काम करणाऱ्या  व्यवसायिकांसाठीचा नेमका अर्थ 

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपावर भाजपचे वर्चस्व! हिमगौरी आहेर-आडके यांचा अर्ज दाखल, पण 'ठाकरे' गटाच्या एन्ट्रीने लढत होणार

SCROLL FOR NEXT