केसनंद, ता. ५ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी हवेली निवडणूक कार्यालयात स्वतंत्र मीडिया कक्षाकडून बातम्या, जाहिराती व प्रचार साहित्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
हवेली तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. मीडिया कक्षाचे समन्वय व कार्यवाही मीडिया अधिकारी योगेश हांडगे, मिलिंद सेटी, वर्षा वाडेकर, स्नेहल शेलार, प्रियांका सुंदर्डे, सुधीर निंबाळकर, एस. गायकवाड हे या कक्षात काम करीत आहेत.
मीडिया कक्षामार्फत मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, केबल टीव्ही, सोशल मीडिया, तसेच विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरील निवडणूकविषयक मजकुराचे सातत्याने निरीक्षण करण्यात येत आहे. कोणत्याही राजकीय पक्षास किंवा उमेदवारास अनुचित लाभ मिळू नये, तसेच शासकीय योजनांची जाहिरात, उद्घाटन, प्रारंभ किंवा प्रचारात्मक प्रसिद्धी आचारसंहितेच्या विरोधात जाऊ नये, यासाठी मीडिया कक्ष दक्षतेने काम करीत आहे. आचारसंहितेचा भंग करणारा मजकूर आढळून आल्यास त्याची तत्काळ नोंद घेऊन संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना सूचित करण्यात येत आहे.
मीडिया कक्षामार्फत माध्यमांना अधिकृत व वेळेवर माहिती उपलब्ध करून दिली जात असून, अफवा, अपप्रचार व चुकीची माहिती रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत पारदर्शकता राखली जात असून, मतदारांपर्यंत योग्य माहिती पोहोचवली जात आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत मीडिया कक्ष २४ तास कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.