केडगाव, ता. १९ ः ‘‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचा मुख्य उद्देश गाव, खेडी समृद्ध व्हावीत हा आहे. या अभियानाचा राज्याचा प्रारंभ दौंड तालुक्यातून होणार असल्याने येथील गावांचा सक्रिय सहभाग निश्चित वाढला पाहिजे,’’ असे मत राज्याचे निवृत्त उपसचिव व यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.
राहू (ता. दौंड) येथील स्वर्गीय आमदार सुभाष कुल यांच्या जयंती कार्यक्रमात गुरुवारी (ता. १८) कलशेट्टी बोलत होते. यावेळी कलशेट्टी यांनी उपस्थितांना निर्मलग्राम, प्लॅस्टिक बंदीची शपथ दिली. यावेळी सुभाष कुल यांच्या राजकीय जडणघडणीत सक्रिय सहभाग असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कुल यांना अभिवादन केले. यावेळी गझलकार नामदेव आबणे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार रंजना कुल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबणे, शिवाजी सोनवणे, नंदू पवार, निळकंठ शितोळे, बाळासाहेब पिलाणे, विठ्ठलराव गुंडपाटील, डॉ. रामदास आबणे, जगन्नाथ नागवडे, ज्ञानदेव ताकवणे, मारुती मगर, अशोक गायकवाड, रमेश पाचपुते, पंढरीनाथ पासलकर, राजकुमार मोटे, सर्जेराव जेधे, महेश भागवत, हरिश्चंद्र ठोंबरे, भगवान जगताप, शहाजी जाधव, अप्पासाहेब हंडाळ, धनाजी शेळके, डॅा. यशवंत खताळ, कांतिलाल काळे, मुरलीधर भोसेकर, साहेबराव वाबळे, अशोक फरगडे, अॅड. बापू भागवत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब पिलाणे म्हणाले, ‘‘जयंती कार्यक्रम हा मर्यादित असतो. पण सुभाष कुल यांच्या यशाचे शिलेदार येथे भेटले याचा आनंद आहे. पुढील वर्षापासून मोठ्या स्वरूपात जयंती केली जाईल.
ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन म्हेत्रे, बाळासाहेब पिलाणे, संभाजी नातू यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
03958