केडगाव, ता. ५ ः ‘‘शेतकरी, कामगार, संचालक मंडळ यांनी योगदान दिले, तर कारखान्याचे आपण सोने करू. येत्या दोन तीन वर्षात भीमा पाटस सर्वच बाबतीत अव्वलस्थानी असेल, असे मत आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
कारखान्याचा बॅायलर प्रदीपन आमदार कुल व कांचन कुल दांपत्याच्या हस्ते शनिवारी (ता. ४) पाटस (ता. दौंड) येथे करण्यात आला. यावेळी कुल पुढे म्हणाले की, ‘भीमा पाटस साखर कारखाना भाडेतत्वावर चालवायला घेताना निराणी उद्योग समूहाने फायदा तोटा पाहिला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द टाकला अन् समूहाचे प्रमुख मुरगेश निराणी यांनी तो सार्थ ठरवला. भीमा पाटस चालवायला घेणे म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार होता. तरीही त्यांनी तो केला. हे आपले भाग्य आहे.’’
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, कार्यकारी संचालक रविकांत पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक तुषार पवार, बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, संचालक व सभासद उपस्थित होते.
यावेळी निराणी उद्योग समूहाने राज्यातील पूरग्रस्तांसाठी ११ लाख रुपये, तर कारखान्याच्या कामगारांनी एक दिवसाच्या पगाराची रक्कम सहा लाख ५५ हजार रुपये मुख्यमंत्री निधीला दिले. दोन्ही रकमांचे धनादेश आमदार कुल यांनी स्वीकारले.
यावेळी कार्यकारी संचालक रविकांत पाटील म्हणाले, ‘‘कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील तीन हजार रुपये प्रतिटन प्रमाणे उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. तोडणी वाहतुकीचा दुसरा हप्ता लवकरच दिला जाईल. यंदा १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.’’
भीमाच्या वजनकाट्याची विश्वासार्हता कायम
निराणी ग्रुपने भीमा पाटस कारखान्याचा रंग सुद्धा बदललेला नाही. कारखाना आहे तसाच आहे. आपण त्यांना फक्त भाडेतत्वावर चालवायला दिलेला आहे. येथील वजन काट्याची विश्वासार्हता, परंपरा आजही टिकून आहे. काटा मारण्याचे प्रकार इथे होत नाही. येथील वजन काट्याची खात्री कोणीही कधीही करू शकतो, असे कुल यांनी स्पष्ट केले.
04003
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.