पुणे

यवत पोलिसांकडून उच्च न्यायालयाचा अवमान

CD

केडगाव ता. २४ : शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या आरोपीला पोलिस कोठडीत घेऊन चौकशी करा, असा उच्च न्यायालयाने आदेश देऊन महिना उलटला तरी आरोपीला अटक होत नाही. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्याची चर्चा परिसरात आहे. यवत पोलिस अटक करत नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनाही या निकालाची कल्पना देण्यात आली होती; मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे.
चौफुला (ता.दौंड) येथील शेतकरी राहुल सरगर व दीपक शेंडगे यांनी पांढरेवाडी येथील आकाश मानसिंग चव्हाणकडून ५ लाख ७५ हजार रुपयांनी ट्रॅक्टर विकत घेतला होता. ट्रॅक्टर हस्तांतरित करताना तीन लाख २५ हजार रुपये दिले होते. चव्हाणने कागदपत्रांची पूर्तता तीन महिन्यांत केल्यानंतर उर्वरित पैसे द्यावयाचे असे २०२३मधील विक्री व्यवहार करारात ठरले होते. त्यानंतर तीन महिन्यांनी सरगर यांनी चव्हाण याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चव्हाणने कागदपत्रांची पूर्तता न करता २०२४मध्ये मध्यरात्री गुपचूप ट्रॅक्टर घेऊन जात असल्याचे सरगर यांना कळले. त्यांनी पाठलाग करून चव्हाण यास अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो थांबला नाही. त्यानंतर सरगर व शेंडगे यांनी यवत पोलिसांत तक्रार दिली होती. गुन्हा दाखल करण्याच्या परवानगीसाठी अनेक महिने हे प्रकरण पोलिस उपविभागीय कार्यालयात धूळ खात पडले. सातत्याच्या पाठपुराव्यानंतर दहा महिन्यांनी उपविभागीय कार्यालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश यवत पोलिसांना दिला. या आदेशाने मे २०२५ मध्ये यवत पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आकाश चव्हाण याने बारामती येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला; मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर चव्हाण उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांनी २५ ऑगस्ट २०२५ला शेतकऱ्याचे घेतलेले सव्वातीन लाख रुपये दोन आठवड्यात परत केले तर जामीन मिळेल, असा निर्णय दिला. चव्हाणने या निर्णयाला संमती दिली होती; मात्र चव्हाण याने दोन आठवड्यात पैसे न भरता न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, असे उच्च न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. अर्ज फेटाळताना उच्च न्यायालयाने दफ्तर दिरंगाईबाबत यवत पोलिसांवर कडक ताशेरे ओढले आहेत; मात्र याचा पोलिसांवर काहीही फरक पडलेला नाही. चव्हाणने केलेला गुन्हा गंभीर असल्याने त्याला पोलिस कोठडीत घेऊन त्याची चौकशी करा, असा आदेश २० नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने दिला आहे. १५ डिसेंबरला फिर्यादी यांनी यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांची भेट घेतली. तातडीने अटक होईल असे तेव्हा सांगितले होते. त्याचवेळी देशमुख यांनी केडगाव दूरक्षेत्रचे फौजदार किशोर वागज व तपास करणारे सहायक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब शेंडगे यांना आरोपीस तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप अटक झाली नाही.

या घटनेचा तपास सुरू आहे आरोपीला लवकरच अटक होईल, तपास अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.
- नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक

खोट्या कागदपत्रांबाबतही ओढले ताशेरे
आकाश चव्हाण याने व्यवहाराची नोटरी दस्त करताना त्याचा भाऊ अविनाश चव्हाणचे आधारकार्ड व फोटो दस्तावर वापरला आहे. आकाश याने दुसऱ्या कागदपत्रे वापरून नोटरी करून दिले. याबाबतही फसवणूक झाल्याची सरगर यांची तक्रार आहे. न्यायालयाने खोट्या कागदपत्रांबाबत निकालात कडक ताशेरे ओढले आहेत.

घटनाक्रम
ट्रॅक्टर खरेदी : २३ ऑक्टोबर २०२३
गुन्हा घडला : ४ ऑगस्ट २०२४
गुन्हा दाखल : १४ मे २०२५
सत्र न्यायालयाने अटक पूर्व जामीन फेटाळला : २४ जुलै २०२५
उच्च न्यायालयाचा पैसे परत देण्याचा आदेश : २५ ऑगस्ट २०२५
उच्च न्यायालयाचा पोलिस कोठडीचा आदेश : २० नोव्हेंबर २०२५
शेतकरी १७ महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी! कॅबिनेट बैठकीत निर्णय; निवडणुकीबाबतही मोठं पाऊल

Sahyadri Trekkers : सह्याद्रीतील लिंगाणा सुळक्यावर ३२ जणांची साहसपूर्ण चढाई; आंतरराष्ट्रीय पर्वत दिन उत्साहात साजरा!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप आमदार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

Mohol News : मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहोळच्या तरुण नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे सन्मानित; शहर विकासासाठी निधीची ग्वाही!

Navi Mumbai: नेरूळ स्थानक परिसरात बेवारस वाहनांचा सुळसुळाट, प्रवाशांची गैरसोय!

SCROLL FOR NEXT