निमगाव केतकी, ता. ९ : इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमगाव केतकी (ता.इंदापूर) पंचक्रोशीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी (ता. ८) गावातील मक्का मशीद ते महात्मा बसवेश्वर चौक, श्री केतकेश्वर चौक, श्रीराम मंदिर चौकात पारिजातक चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी गावातून सर्वांचे लक्ष वेधक आकर्षक अशा मक्का मदिनाची प्रतिकृतीची जुलूस (मिरवणूक)काढण्यात आली. दरम्यान मिरवणुकीच्या वेळी गावात चौका चौकामध्ये हिंदू बांधवांनी जुलूसचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
या जुलुसामध्ये निमगाव वरकुटे खुर्द मुस्लिम बांधवांसह उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड , पश्चिम बंगाल आदी राज्यातील डाळिंब टोमॅटो व्यापारी कामगार वर्ग , तसेच सोनाई उद्योग समूहातील कामगार, लहान मुले-मुली मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. रात्री श्री केतकेश्वर चौकात लहान मुलांनी मुस्लिम धर्मातील विचार आचारावर आधारित बयान व नातेपाकचे सादरीकरण केले. यावेळी सहभागी लहानग्यांना बक्षीसरुपी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मक्का मशिदीचे पेश इमाम मौलाना वारीस जमाली यांनी जगात शांततेसाठी प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी घालून दिलेल्या विचाराचे आचरण दैनंदिन जीवनात अनुकरण करावे असे आपल्या बयानमध्ये (प्रवचनात) सांगितले. ईद-ए-मिलाद निमित्त महाप्रसाद (लंगर खाना) ही देण्यात आला. इद ए मिलादचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी विशेष प्रयत्न घेतले.