पुणे

पितापुत्रांनी घेतले १७ गुंठ्यातील डाळिंबाचे पाच टन उत्पादन

CD

निमगाव केतकी, ता.२१: निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील सेवानिवृत्त ग्रंथालय परिचर माणिक विठ्ठल ननवरे व त्यांचा मुलगा विजय ननवरे यांनी अवघ्या १७ गुंठ्यातील डाळिंबी च्या अडीचशे झाडामधून पहिल्या बहारातून उच्चांकी दर्जेदार पाच टन डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे.
ननवरे यांनी ननवरेवस्ती- दत्तनगर येथे सतरा गुंठ्यामध्ये नऊ बाय सहा अंतरावर डाळिंबाच्या भगव्या जातीची २५० झाडे लावली आहेत.झाडे १३ महिन्याची झाल्यानंतर एक मार्चला छाटणी करून पहिला बहर धरला. बाग धरल्यानंतर अलीकडे बहुतांश शेतकरी तेल्या रोग येऊ नये म्हणून बाग नेटने झाकतात मात्र ननवरे यांनी बाग न झाकता बहार धरला.
प्रत्येक झाडाला लागवडीच्या वेळेस त्यानंतर सहा महिन्यानंतर व माल धरताना असे तीन वेळा कुजलेल शेणखत टाकले. शेण, गोमूत्र, सरकी पेंड, भुगी पेंड व गुळ यांचे सात दिवस भिजवलेल्या मिश्रणाची स्लरी बहार झाल्यानंतर प्रत्येक झाडाच्या बुडाला दर एक महिन्यानंतर तीन वेळा सोडली.जैविक व विद्राव्य खतांचा वापर केला. कीटकनाशकांच्या फवारणी देखील वेळेवर घेतल्या. बागेचा ३ सप्टेंबरला पहिला तोडा तीन टन ४०० किलो निघाला व त्याला नव्वद रुपये किलो दर मिळाला.१४ सप्टेंबरला दुसरा तोडा एक टन ७०० किलो निघाला याला दर ६१ रुपये किलोस दर मिळाला.
ननवरे पिता पुत्र म्हणाले, बागेला घरच्या घरी तयार केलेल्या स्लरीचा खूप फायदा झाला.१०० ग्रॅम ते साडेतीनशे ग्रॅमपर्यंतची तेल्या, डांबऱ्या व कुजवा नसलेली दर्जेदार फळे मिळाली.बाग नेट नी न झाकल्यामुळे वजनही जास्त मिळाले.कमी क्षेत्रात कमी कालावधीमध्ये पहिल्या बहारातून पाच टनातून तीन लाख ९० हजार रुपये झाले. बागेचा सर्व खर्च ८० हजार रुपये झाला आहे.
माणिक ननवरे यांनी ६४ वेळा रक्तदान केले आहे.त्यांना सर्वश्रेष्ठ रक्तदाता हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची फक्त दोन एकर शेती आहे.सध्या त्यांच्याकडे सतरा गुंठ्यामध्ये डाळिंब, नऊ गुंठ्यात घोसावळा व पाऊण एकरामध्ये पेरू अशी पिके आहेत. माणिक ननवरे यांचा थोरला मुलगा गणेश हा नोकरी करतो तर पत्नी सुमन, एम.ए. झालेला मुलगा विजय व त्याची बीएससी ऍग्री बायोटेक झालेली पत्नी दिपाली हे चौघेजण शेतातून दर्जेदार उत्पादन घेत आहेत.
02917

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Reform : देशातील जनता 'गब्बर सिंग टॅक्स' कधीही विसरणार नाही; मल्लिकार्जून खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Viral: एआयची कमाल! महिलेने ChatGPT वापरून $150,000 ची लॉटरी जिंकली, पण कशी? जाणून घ्या...

IND vs PAK: अरे कॅच घेतला रे! संजू सॅमसनने जमिनीलगत झेलला चेंडू, पाकिस्तानी फलंदाजही झाला शॉक; पाहा Video

हुंड्यासाठी विवाहितांचा वाढतोय कौटुंबिक छळ! ‘माहेरहून पैसे आण नाहीतर मूल होऊ देणार नाही’, सासरच्यांची विवाहितेला धमकी; पैशासाठी मेव्हण्याचे तुकडे करण्याची पतीची धमकी

Nashik Accident:'वाहन पलटी हाेऊन १ ठार तर ११ गंभीर जखमी'; सप्तशृगी वणी गडावर ज्याेत नेण्यासाठी जाताना घडली घटना, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT