पुणे

निमगाव केतकीमधून स्वामींच्या पालखीचे अक्कलकोटकडे प्रस्थान

CD

निमगाव केतकी, ता. ४ : इंदापूर तालुका श्री स्वामी समर्थ सेवा संघाचा निमगाव केतकी ते अक्कलकोट हा पायी पालखी सोहळा निमगाव केतकी येथून टाळ मृदंगाच्या गजरात आणि स्वामी समर्थांच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाला.
श्री संत तुकाराम महाराज पालखी तळावर पूजापाठ आणि आरती झाल्यानंतर स्वामी समर्थांचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पालखी रथाला बैलजोडी असून पुढे तुतारीवाले, भजनीमंडळ, घोडा, चौघडा आहे. सुवर्णयुग गणेश मंदिराजवळ सोहळ्याचे स्वागत सुवर्णयुग ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, भीमराव बोराटे, ॲड. दिलीप पाटील, अर्जुन घाडगे यांनी तर संत सावतामाळी चौकात राजू भोंग, बबन खराडे, तुषार खराडे, विक्रम जगताप यांनी केले.
पालखी सोहळा प्रमुख हनुमंत काळे म्हणाले, ‘‘स्वामी समर्थाच्या पायी पालखी सोहळ्याचे हे पहिले वर्ष आहे. या सोहळ्यात तालुक्यातील ४८ गावातील सुमारे एक हजार महिला व पुरुष सहभागी आहेत. प्रत्येकाच्या हातात भगवा पताका, गळ्यात भगवा शेला, भगवी टोपी आणि संघाचा बॅच असा पेहराव आहे. निमगाव ते अक्कलकोट हे १६५ किलोमीटर अंतर असून वाटेत सात मुक्काम होणार आहेत. पहिल्या वर्षी भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धर्मेंद्र यांचा अखेरचा आवाज…! इकडे 'इक्कीस' सिनेमातील धर्मेंद्र यांची वॉईस नोट व्हायरल, दुसरीकडे पंचतत्वात विलीन झाले ही मॅन

Karnataka Politics : मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पुन्हा उधाण! DK शिवकुमारांनी दिला थेट इशारा; म्हणाले, 'घर फोडण्याचं काम..'

गॅरेजमध्ये काम करणारे धर्मेंद्र कसे झाले सुपरस्टार? दोन वेळच्या जेवणासाठी करावं लागत होतं ओव्हरटाईम

IND vs SA: कुलदीप - वॉशिंग्टनची झुंज, पण भारतीय संघ ऑलआऊट! यान्सिनच्या ६ विकेट्स; द. आफ्रिकेने फॉलोऑन दिला की नाही?

Satara Accident: 'टेंपोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू'; लोणंद- नीरा रस्त्यावर अपघात, एक जण गंभीर जखमी..

SCROLL FOR NEXT