पुणे

वरकुटेच्या नागेशची उपनिरीक्षक पदी निवड

CD

निमगाव केतकी, ता. २८ : वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथील नागेश ठवरे यांची केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामधील (सीएपीएफ) केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये उपनिरीक्षक पदी निवड झाली.
कर्मचारी निवड आयोग आयोजित (एसएससी-सोपीओ २०२४) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नागेशची उपनिरीक्षक पदी निवड झाली. जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमांच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागेशचे प्राथमिक शिक्षण काटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व माध्यमिक शिक्षण हे काटेश्वर माध्यमिक विद्यालयात झाले. तर, बी.टेक मेकॅनिकल ही पदवी इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील महाविद्यालयातून त्याने घेतली आहे.
मार्च २०२५ मध्ये नागेशच्या थोरल्या बहिणीने पोलीस उपनिरीक्षक पदी गवसणी घातल्यानंतर आता त्याने स्वतः हे यश संपादन केले. याबद्दल वडील पंढरीनाथ ठवरे व आई वैशाली ठवरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Law Reforms: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! आता 'या' गुन्ह्यांसाठी तुरुंगवास होणार नाही, रद्द केलेले १३ नियम कोणते?

'माझ्या मुलगी तिच्या इच्छेने किसिंग सीन करु शकते' रवीना टंडन मुलीबद्दल बोलताना म्हणाली, 'मी इंटिमेंट सीननंतर 100 वेळा दात घासले!'

Shreyas Iyer ची काळजी घेण्यासाठी बहीण जाणार सिडनीला, BCCI करणार खास व्यवस्था; सूर्यकुमारनेही दिले अपडेट्स

Latest Marathi News Live Update : औषधटंचाईविरोधात समाजवादी पार्टीचे ‘भीख मागो’ आंदोलन मनमाडमध्ये!

आजोबा राज्यपाल आणि गर्भश्रीमंत घराणं ! अभिनयासाठी घरातून पळाला पण कामामुळे खाल्ला बायकांकडून चपलांचा मार

SCROLL FOR NEXT