मनोहर चांदणे
निमगाव केतकी : शेळगाव (ता. इंदापूर) येथील पाच दिवस चालणाऱ्या श्री संत मुक्ताबाई यात्रेस सोमवारी (ता. ३) प्रारंभ झाला असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी (ता. ३) सकाळी साडेदहा वाजता भेट दिली असता या ठिकाणी दोन्हीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते.
या आरोग्य केंद्रात डॉक्टर प्रतीक्षा देवकर व डॉक्टर प्रणाली भजगवळी या कार्यरत आहेत. सकाळी साडेदहा वाजता केंद्रात भेट दिली असता या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमीच होती. तीन चार रुग्ण डॉक्टरांची वाट पाहत होते यातील एक ज्येष्ठ नागरिक बाकड्यावरती झोपलेले होते. साडेदहा वाजता आलेल्या आरोग्य मदतनीस एस.डी.नवले म्हणाल्या, गाडी नादुरुस्त झाल्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी येण्यास आज थोडा उशीर झाला आहे. येथील ओपीडी नऊ वाजता सुरू झाल्यानंतर दिवसभर सुरू असते रात्रीही येथे रुग्णांना सेवा दिली जाते. दोन कोटी ३६ लाख रुपये खर्च करून मार्च २०१९ मध्ये या ठिकाणी बांधलेल्या अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्था बिघडलेली आहे. सध्या या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे; मात्र साठवणीसाठी असलेल्या टाक्या लिकेज असल्यामुळे पाण्याची समस्या भेडसावत आहे.तसेच ड्रेनेचा पाइप फुटल्यामुळे देखील या ठिकाणची पाच स्वच्छतागृह बंद आहेत. पाण्याच्या टाक्या लिकेज असल्यामुळे व ड्रेनेजची पाइप फुटल्यामुळे केंद्रामध्ये घाण वास येत आहे. एवढा मोठा खर्च करून या ठिकाणी बांधलेल्या मोठ्या इमारतीमध्ये रुग्णांना चांगली सेवा व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.
3039
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.