पुणे

साठेसाईला तीन सोलर वॉटर हीटरचे वाटप

CD

कोळवण, ता, २४ ः साठेसाई (ता. मुळशी) या छोट्याशा दुर्गम भागातील गावासाठी इनरव्हिल क्लबकडून तीन सोलर वॉटर हीटर संच प्रदान करण्यात आले. क्लबच्या अध्यक्षा ऑस्ट्रेलियाच्या के. मॉरलॅण्ड, तसेच इंटरनॅशनल एडिटर मीडिया सरव्यवस्थापक स्मिता पिंगळे यांच्या उपस्थितीत पुणे येथील फोर पॉईंट्स शेरेटोन हॉटेल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
पिंपरी, निगडी, भोर व तळेगावच्या २० इनरव्हील शाखांनी मिळून या पर्यावरण पूरक प्रकल्पाला मोलाचे सहकार्य केले. आतापर्यंत साठेसाई गावात एकूण नऊ सोलर वॉटर हिटर संच बसविण्यात आले आहेत. ज्यामुळे गावात अंघोळीसाठी दररोज ४५०० लिटर गरम पाणी कुठलेही इंधन न जाळता सहज उपलब्ध होत आहे. या पर्यावरण पूरक उपक्रमामुळे गावात दरवर्षी किमान ५० ते ६० वृक्षांची होणारी वृक्षतोड थांबली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होत आहेच, शिवाय महिलांची चुलीच्या धुरापासून मोठ्या प्रमाणात मुक्तता झाली आहे.
यावेळी इनरव्हीलच्या उच्चस्तरीय संपादिका व मीडिया सरव्यवस्थापक स्मिता पिंगळे, कमलजीत कौर, दलजीत रायजादा, सुविधा नाईक, उज्ज्वला नवले, पूर्णिमा लुनावत, लीना खंडेलवाल, रिचया बन्सल, सुधा भट, अंतरा देशपांडे, रोशन चिंधी, शोभना पालेकर, असोसिएशन अध्यक्षा ज्योती महिपाल, डिस्ट्रिक्ट ३१३ अध्यक्षा आशा देशपांडे, वर्षा काळे व सर्व क्लबच्या सदस्या व साठेसाईचे माजी उपसरपंच गणपत साठे आदी उपस्थित होते.

इनरव्हील क्लब गेली चार वर्षे गावात सामाजिक, पर्यावरण पूरक उपक्रम राबवित आहे. या प्रकल्पामुळे गावाने शुन्य कार्बन उत्सर्जनाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, भविष्यात साठेसाईला पर्यावरण समृद्ध व पर्यावरण संतुलित गाव म्हणून ओळखले जाईल.
- गणपत साठे, माजी उपसरपंच, साठेसाई

इनरव्हील क्लब गेली चार वर्षे गावात सामाजिक, पर्यावरण पूरक उपक्रम राबवित आहे. अनेक सामाजिक उपक्रमांसाठी इनरव्हील क्लब या संस्थेने साठेसाई हे गाव दत्तक घेतले आहे.
- स्मिता पिंगळे, इनरव्हील क्लब

02485

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manjari Railway Accident : पुणे-दौंड डेमूच्या धडकेत तीन तरुण जागीच ठार; हडपसर पोलिसांकडून कसून तपास सुरू

Solapur Crime:'बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून दोघांनी केला चेक लंपास'; पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा..

चोर-पोलिसांचा जुना खेळ संपला !; 'चोरट्यांचा फोन पे, गुगल पेवरून संवाद'; पोलिसांना सापडू नये म्हणून नवी शक्कल?

Latest Marathi Breaking News : नंदुरबारमध्ये शिंदेंना भाजपचा दे धक्का, एकनिष्ठ शिवसैनिकाचा शिवसेनेला रामराम

Pune ATS : एटीएसच्या तपासात झुबेरचे दहशतवादी मनसुबे उघडकीस; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

SCROLL FOR NEXT