पुणे

चिखलगाव रस्त्याचे चार वर्षांपासून रखडले काम

CD

कोळवण, ता, २६ ः मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चिखलगाव (ता. मुळशी) येथील सुमारे एक किलोमीटर अंतर असणाऱ्या रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून फक्त आणि फक्त ठेकेदाराच्या मनमानीमुळे व अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे रखडले आहे.
या रस्त्यासाठी चार वर्षांपूर्वी सुमारे ८० लाख रुपयांचा निधी २०२१ मध्ये मंजूर झाला आहे. चार वर्षांपासून या रस्त्याचे काम पूर्ण करा म्हणून चिखलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पुणे येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेटून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्याकडे येथील अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याचे काम सुमानीक स्टोन क्रशर कंपनीने घेतले असून, या कंपनीचे अधिकारी हितेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या रस्त्याबाबत मला माहिती विचारू नका, अधिकारी यांना विचारा, असे उद्धटपणे उत्तर दिले. यावर शासकीय अधिकारी अभिजित मुंडे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, आम्ही शनिवारी (ता. २७) संबंधित रस्त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहोत.
सकाळ व स्वराज्य पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू फाले यांनी याबाबत कार्यकारी अभियंता स. स. नगरारे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणल्यावर अभियंता नगरारे यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना चिखलगाव व नांदगाव येथील रस्त्यांची कामे दोन दिवसांत सुरू करा, असे आदेश दिले आहेत. यावेळी सरपंच किरण फाले, माजी सरपंच किरण फाले, राजू फाले उपस्थित होते

दृष्टिक्षेपात
शासनाचा ८० लाखांचा निधी खड्ड्यात
रस्त्यावर मोठाले खड्डे
२०० मीटर अंतर असणारा रस्ता केलाच नाही
रिटर्निंग भिंत बांधली नाही

02510

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajan Patil: अनगरच्या राजन मालकांनी शिवजयंतीची तारीखच बदलली; कौटुंबिक कारणामुळे परंपरा केली खंडित

TCS Case Fine : TCS च्या अडचणीत मोठी वाढ! अमेरिकन अपील कोर्टानेही ठोठावला ₹1,738 कोटींचा दंड; नेमक प्रकरण काय आहे?

गर्भवती सुनेचे राक्षसी कृत्य! झोपेच्या गोळ्या देऊन सासूची हातोड्याने निर्दयी हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी रॉकेलने दिले पेटवून

Latest Marathi News Live Update : नाशिकमधील प्रारूप मतदार यादीतून चक्क भाजप नेत्याचच नाव गायब

Vikas Mhatre: “...तर अदृश्य शक्ती बाहेर काढू”, मतदार यादीतील घोळावरून विकास म्हात्रे यांचा संतप्त इशारा

SCROLL FOR NEXT