कोळवण, ता. ९ : मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील काशिग, भालगुडी, हाडशी, वाळेण, साठेसाई, कोळवण, डोंगरगाव मुख्य गावठाण, नांदगाव, चिखलगाव, नाणेगाव, होतले, दखणे व कुळे या गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास, शैक्षणिक प्रगतीमधून शाळा इमारत, रस्ते बांधणी, सार्वजनिक सभागृह, स्मशानभूमी सुधारणा, वीजपुरवठा व्यवस्था यांसारख्या पायाभूत सोयींची उभारणीच्या कामांचा समावेश आहे. यावेळी बोलताना आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले की, ग्रामविकास हाच विचार मनात ठेवून ग्रामविकासाच्या दिशेने केलेल्या विकास कामांसाठी सातत्यपूर्ण पाठपुराव्याला भरघोस निधी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली मुळशी तालुक्यातील अनेक गावांमधील महत्त्वपूर्ण विकासकामांना गती मिळणार आहे.
यावेळी विविध गावांतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी, रवींद्र कंधारे, अंकुश मोरे, तुकाराम टेमघरे, यशवंत गायकवाड, महादेव दुडे, बबन धिडे, कालिदास गोपालघरे, मिलिंद वाळंज, प्रवीण धनवे, सचिन अमराळे, चेतन फाले, संतोष पेरणेकर, काळूराम आखाडे उपस्थित होते.
02671