कोळवण, ता. १९ ः काशिग (ता. मुळशी) येथे मंगळवारी (ता. २०) आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमधील स्पर्धकांच्या स्वागतासाठी पारंपरिक ढोल लेझीम व वारकरी संप्रदायाचे खेळ सादर करून स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासक शरद बेलदार ग्रामविकास अधिकारी राहुल शेलार यांनी दिली.
काशिग ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतीच विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेत स्पर्धेचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वागत तयारी, तसेच ग्रामस्थांचा सहभाग याबाबत सविस्तर चर्चा करून विविध कार्यक्रमांची सुस्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आली.
या ग्रामसभेस मंडळ अधिकारी बलभीम पाटील, प्रशासक सुरेश बेलदार, ग्राम महसूल अधिकारी अरुण पाटील, ग्रामविकास अधिकारी राहुल शेलार, मुख्याध्यापक गायकवाड, काशिगचे पोलिस पाटील सुनील मगर, नामदेव टेमघरे, कोळवण केंद्राचे डॉ. गोरे, लाइनमन राठोडकर, अंगणवाडी सेविका, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे होणार स्वागत
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती व लोककला जगासमोर मांडण्यासाठी भजनी मंडळ, ढोल-ताशा पथक आणि विद्यार्थ्यांचा शालेय गणवेशात सहभाग ठेवण्यात येणार आहे. यासाठी भव्य व आकर्षक स्टेज उभारण्यात येणार असून, त्याचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान उपस्थित असणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था अशोक बोंद्रे करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.