पुणे

उरावड्यात पहिले सखी मतदान केंद्र

CD

कोळवण, ता. ७ ः मुळशी तालुक्यातील पहिले सखी मतदान केंद्र उरवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी ‘माझे मत माझा अधिकार’ हे नाव टाकून निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह रांगोळीतून रेखाटले आहे. तसेच प्रवेशद्वारावर गुलाबी फुग्यांची आकर्षक कमान तयार करून सखी मतदान केंद्र असा नामफलक लावला आहे.
मतदान करुन आल्यावर बाहेर मतदारांना सेल्फी काढण्यासाठी आकर्षक गुलाबी रंगाचा ‘मला अभिमान आहे मी मतदान केल्याचा’ या नावासह सेल्फी पॉइंट उभारला आहे. त्याचा लाभ मतदारांनी उत्साहात घेतला. थोडक्यात हे पिंक सखी मतदान केंद्र तालुक्यात आकर्षणाचे व चर्चेचे मतदान केंद्र ठरले आहे.
या मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शौचालयाची सुविधा उपलब्ध असून दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था केली आहे. बाहेर टेबल लावून येणाऱ्या मतदारांसाठी त्यांचे मतदार यादीतील नाव शोधून देण्यासाठी देखिल मदत करण्यात येत आहे.


सर्व कामकाज महिलांच्या हाती
मुळशीच्या नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी यांनी सांगितले की, या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून पद्मा भूमकर, मतदान अधिकारी म्हणून शुभांगी निघोट, अनुरुपा माळवदकर, माधवी रामटेके या तिघी काम पाहत आहेत. पुरवठा निरीक्षक अपर्णा वडूलकर, बीएलओ शुभांगी टाकळीकर, ग्राम महसूल अधिकारी मीरा बोराडे, पोलिस पाटील निशिगंधा गुरव, शिपाई सविता लोंढे, पोलिस शिपाई देखिल महिला आहेत यासोबतच आशा सेविका देखिल मदतीला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident: गाडीला पोलिसांची नेमप्लेट, चालक मद्यधुंद अवस्थेत, अनेक वाहनांना उडवलं अन्...; नवी मुंबईतील थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, आता 'या' तारखेला होणार प्रदर्शित !

U19 World Cup जिंकून आलेल्या आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशीसह भारतीय संघाचे मुंबईत जंगी स्वागत; पाहा खेळाडूंची रिअॅक्शन

Beed : नवरदेव पळून का गेला? मंडपात पोलिसांना पाहताच धाबे दणाणले, खरं कारण आलं समोर

रस्त्यावर फिरणाऱ्या आजारी वडिलांची कस्टडी नाकारली ! बॉलिवूड स्टार असलेली मराठी अभिनेत्री अचानक झाली गायब

SCROLL FOR NEXT