crime news esakal
पुणे

Shkrapur Crime : ‘तू माझ्यासोबत चल नाहीतर मी आत्महत्या करेन,’ अशी धमकी दिली आणि तिला थेट पळवूनच नेले.

एका १७ वर्षीय मुलीला आत्महत्येची धमकी देऊन पळवून नेणाऱ्याला बुलढाणा येथून शिक्रापूर पोलिसांनी अटक तर केलीच शिवाय सोबत असलेल्या अपहृत मुलीची सुटकाही केली.

सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर - येथील एका १७ वर्षीय मुलीला आत्महत्येची धमकी देऊन पळवून नेणाऱ्या चेतन मारुती मलगुंडे (वय १९, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) याला बुलडाणा येथून शिक्रापूर पोलिसांनी अटक तर केलीच शिवाय सोबत असलेल्या अपहृत मुलीची सुटकाही केली. या प्रकरणी चेतनवर अपहरण, बलात्कारासह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, येथील एका १७ वर्षीय युवतीची ओळख चेतन मलगुंडे या युवकासोबत काही दिवसांपूर्वी झाली होती. ही ओळख त्याने वाढविली व तिला लग्नाची गळ घालायला सुरुवात केली. पुढे ही मुलगी ऐकत नसल्याने चेतन याने ‘तू माझ्यासोबत चल नाहीतर मी आत्महत्या करेन,’ अशी धमकी द्यायला सुरुवात करीत एक दिवस तिला थेट पळवूनच नेले.

या मुलीच्या कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल करताच एक स्वतंत्र पोलिस पथकच या तपासासाठी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी नेमले. या पथकाने पुढील दोनच दिवसांत चेतन मलगुंडेचा शोध घेत थेट बुलडाणा गाठले. तेथून मलगुंडे याला अटक केली आणि अपहृत मुलीची सुटकाही केली. दरम्यान, चेतनला शिरूर न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे व पोलिस नाईक अमोल नलगे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT