पुणे

शिक्रापुरातील लॉज चालकावर वेश्या व्यवसायाप्रकरणी गुन्हा

CD

शिक्रापूर, ता. १३ : येथील पाबळ चौक परिसरात असलेल्या शारदा लॉजवर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत एका महिलेसह लॉज चालकाला ताब्यात घेतले.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरात असलेल्या शारदा लॉजवर बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली. यावर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलिस हवालदार रोहिदास पारखे, विकास पाटील, महिला पोलिस शिपाई किरण निकम यांचे पथक नेमले. या पथकाने वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला असता त्यांना लॉज चालकासह वेश्याव्यवसाय करणारी एक महिला मिळून आली. दरम्यान पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत चौकशी केली असता लॉज चालक संतोष पुजारी याने तिला वेश्याव्यवसायासाठी प्रोत्साहित केल्याचे महिलेने सांगितले. यात पोलिसांनी महिलेसह लॉज चालकाला ताब्यात घेतले. याबाबत महिला पोलिस शिपाई किरण नाना निकम (रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लॉज चालक संतोष सीना पुजारी (सध्या रा. शिक्रापूर, मूळ रा. शेडमणी, ता. हेब्री, जि. उडप्पी, कर्नाटक) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलेचे रवानगी महिला सुधारगृहात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Alphonso mango : रत्नागिरी हापूस आता एआय तंत्रज्ञानावर; मोबाईल ॲपवरून बागेचे व्यवस्थापन होणार, हापूस शेतीत डिजिटल क्रांती

'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

SCROLL FOR NEXT