पुणे

शिक्रापुरात महिलेवर अत्याचार, पती, मुलांना मारण्याची धमकी

CD

शिक्रापूर, ता. ५ : नोकरीच्या निमित्ताने शिक्रापुरात (ता. शिरूर) आपल्या कुटुंबीयांसमवेत राहायला आलेल्या महिलेची ओळख वाढवून तिच्या घरी जाऊन तिच्यावर येथील प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे (वय २१, रा. बजरंगवाडी- शिक्रापूर) याने लैंगिक अत्याचार केला. याबाबत बाहेर कुठे बोललीस तर पती व मुलांना ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. याबाबत पिडीतेच्या फिर्यादीनंतर त्याच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती फौजदार विजय मस्कर यांनी दिली.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, नोकरीच्या निमित्ताने आपल्या पती व मुलांसह या भागात राहायला आलेल्या एका महिलेची ओळख प्रथमेश उर्फ समर्थ याने वाढवून महिलेच्या घरी ये-जा सुरू केली. अशाच पद्धतीने पिडीत महिला घरात एकटी असल्याचे पाहून त्याने तीला थेट लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मारहाण करून तीला जखमी केले. तसेच, पिडीतेला घरात कोंडून घराला कुलूप लावून तो निघून गेला. पिडीत महिलेने कसाबसा दरवाजा उघडून आपली सुटका करून घेतली व आपल्या गावी जाण्यासाठी ती पुणे- अहिल्यानगर महामार्गावरील प्रवासी रिक्षात बसली. हे त्याच्या लक्षात येताच त्याने पुन्हा तीला रस्त्यातून परत घरी आणले व पुन्हा बेदम मारहाण केली. या प्रकाराबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करुन त्याला तत्काळ अटक केली. त्याला शिरूर न्यायालयाने ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, शिक्रापूर परिसरात कुणालाही काही त्रास असल्यास तत्काळ आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही कुणालाही सोडणार नाही. महिला अत्याचाराच्या बाबतीत आम्ही अत्यंत संवेदनशील असून, तक्रारीनंतर तत्काळ गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! झेडपी, मनपा, नगरपालिकांच्या शाळांमध्ये नेमले जाणार अंशकालीन निदेशक; दरमहा १८ हजार मानधन; शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार; पटसंख्येची अट अशी...

Weekend Special Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं हवंय? ट्राय करा पनीर बेसन चिला; चव अशी की एकदा खाल्ल्यावर रोज बनवाल

WPL 2026 Prize Money: विजेत्या RCB ला अन् उपविजेत्या दिल्लीला किती कोटींचं बक्षीस? पुरस्कार विजेत्या खेळाडूही मालामाल

ढिंग टांग : पुणे-मुंबई: एक थरारयात्रा..!

अग्रलेख : द्रुतगती छळमार्ग!

SCROLL FOR NEXT