पुणे

रुंद वरंबापद्धतीचा अवलंब करा

CD

काटेवाडी, ता.२९ : यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. या पार्श्वभूमीवर, रुंद वरंबा सरी पद्धत (ब्रॉड बेड फुरो सिस्टीम - बीबीएफ) पेरणी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.
कमी पर्जन्यमानात पाण्याचा ताण कमी करणे आणि जास्त पावसात पाण्याचा निचरा करणे यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ शक्य आहे.

बीबीएफ तंत्रज्ञानाची उपयुक्तता....
खरीप आणि रब्बी हंगामासाठी उपयुक्त: बीबीएफ पद्धत खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि मका यांसारख्या पिकांसाठी, तर रब्बी हंगामात हरभरा पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
जिरायती भागात विशेष लाभ: कमी पावसाच्या क्षेत्रात पाण्याचे संरक्षण आणि जास्त पावसात पाण्याचा निचरा यामुळे जिरायती शेतीसाठी ही पद्धत विशेष फायदेशीर आहे.

बीबीएफ पद्धतीचे फायदे....
१. पाण्याचे संरक्षण: बीबीएफ यंत्राने उतारास आडवी पेरणी केल्याने पावसाचे पाणी सरीत साठते आणि जमिनीत मुरते. यामुळे कमी पावसातही पिकांना पाण्याचा ताण कमी जाणवतो.
२. अतिरिक्त पाण्याचा निचरा: जास्त पावसाच्या काळात सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते, ज्यामुळे पिकांचे नुकसान टळते.
३. खर्चात बचत: या पद्धतीमुळे बियाणे, खते यांसारख्या निविष्ठांवर २० ते २५ टक्के बचत होते.
४. पिकांची जोमदार वाढ: सरीमुळे पिकांना हवा आणि सूर्यप्रकाश मुबलक मिळतो, यामुळे पिके कीड-रोगांना कमी बळी पडतात.
५. जमिनीची सुपीकता: बीबीएफमुळे जमिनीची धूप कमी होते, सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास थांबतो आणि जमिनीची सच्छिद्रता वाढून ती भुसभुशीत राहते.
६. सुलभ आंतरमशागत: सरीमुळे उभ्या पिकात ट्रॅक्टर किंवा मनुष्यचलित फवारणी यंत्राद्वारे कीटकनाशक फवारणी करणे सोपे होते.


दरम्यान, बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज आहेत. काही शेतकरी मानतात की, सरीमुळे एक ओळ कमी होऊन हेक्टरी झाडांची संख्या आणि उत्पादन कमी होते. परंतु, प्रत्यक्षात या पद्धतीमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.

सध्या पावसाचे प्रमाण चांगले असल्याने ही पद्धत अधिक फायदेशीर ठरेल. कमी पावसात पाण्याचे संरक्षण आणि जास्त पावसात निचरा यामुळे सोयाबीन, तूर, उडीद यांसारख्या कडधान्यांचे नुकसान टाळता येईल. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून या तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी आणि याचा अवलंब करून उत्पादन वाढवावे.
- टी. के. चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT