पुणे

खरिपासाठी २७ टक्के क्षेत्रावर पेरणी

CD

काटेवाडी, ता. २६ : पुणे जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ साठी पेरणीला चांगला वेग आला आहे. जिल्ह्यातील एकूण दोन लाख दोन हजार २,६३ हेक्टरपैकी ५५ हजार ३४६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच २७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. काही तालुक्यांमध्ये पेरणीने चांगली प्रगती दर्शवली आहे, तर काही ठिकाणी पेरणीचे प्रमाण कमी आहे.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी पुरंदर, शिरूर, आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये पेरणीने आघाडी घेतली आहे. पुरंदर तालुक्यात १८,५३१ हेक्टरपैकी १०,४४७ हेक्टरवर, शिरूर तालुक्यात २७,६०२ हेक्टरपैकी ११,०२२ हेक्टरवर, आणि जुन्नर तालुक्यात २५,२८६ हेक्टरपैकी ९,०४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याशिवाय, भोर तालुक्यात १६,०२४ हेक्टरपैकी ३,०८० हेक्टरवर पेरणी झाल्या आहेत. दुसरीकडे, मुळशी, वेल्हा, आणि हवेली या तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात सरासरी ६५० ते ७०० मिलिमीटर पाऊस पडतो, जो खरीप पिकांसाठी अनुकूल आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाचे योग्य वितरण झाल्याने पुरंदर, शिरूर, आणि जुन्नरसारख्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र, मुळशी आणि वेल्हा सारख्या तालुक्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे पेरणीला विलंब होत आहे. यंदा शेतकरी बाजरी, ज्वारी, आणि कडधान्ये यांसारखी खरीप पिके मोठ्या प्रमाणात लावत आहेत.
---------------------------------------------
तालुकानिहाय पेरणी तक्ता (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका.......सरासरी........पेरणी.........टक्केवारी
हवेली.........५,३०३.........३७२..............७
मुळशी........८,३६९.........२३४..............३
भोर...........१६,०२४........३०८०............१९
मावळ..........१३,८१९..........६९५............५
वेल्हा...........५८३३...........११६.............२
जुन्नर..........२५,२८६.........९,०४४..........३६
खेड..........३३,०१५..........७,११८.........२२
आंबेगाव........१६,५४६........५,२९४...........३२
शिरूर.........२७,६०२........११,०२२..........४०
बारामती........११,७९६........२,३२२..........२०
इंदापूर........१४,००६.........२,२५१..........१६
दौंड...........६,१३१.........३,३५१..........५५
पुरंदर...........१८,५३१........१०,४४७..........५६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT