काटेवाडी, ता. ५ ः ‘महसूल सप्ताह २०२५’ अंतर्गत पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मंडलनिहाय राबवण्यात आले. या अभियानात एकूण १३,२०६ दाखले आणि प्रमाणपत्रांचे वितरण केल्याने नागरिकांमध्ये सामधानाचे वातावरण आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
या शिबिरामध्ये जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास दाखले, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रे, शिधापत्रिका, आधार कार्ड, सातबारा उतारे, संजय गांधी निराधार योजना, आयुष्यमान भारत कार्ड, फेरफार नोंदी आणि इतर सेवांचा समावेश आहे. या अभियानामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना १३,२०६ दाखले आणि योजनांचा लाभ त्वरित मिळाला. प्रशासकीय प्रक्रिया गतिमान झाल्याने नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचले, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी नमूद केले.
अभियानाचा उद्देश
नागरिकांना त्वरित दाखले आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करणे.
शासकीय योजनांचा लाभ गावपातळीवर पोहोचवणे.
प्रशासकीय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करणे.
तालुकानिहाय कामगिरी
जुन्नर
जातीचे दाखले - ६६
उत्पन्न दाखले - ८६
अधिवास दाखले- २२
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रे - १६
आंबेगाव
जातीचे दाखले - २०
उत्पन्न दाखले - १२६
अधिवास दाखले - ९
नॉन-क्रिमीलेअर - १२
शिधापत्रिका - ११
आधार कार्ड- ३९
संजय गांधी निराधार योजना - ४४
अल्पभूधारक - १८
ईडब्ल्यूएस - १३
आरटीएस - ३४
मावळ
जातीचे दाखले - १४
उत्पन्न दाखले - २०३
अधिवास दाखले - ३२,
शिधापत्रिका - ३१
आधार कार्ड - ४६
संजय गांधी योजना - २३
सातबारा उतारे - ५४
फेरफार - २४७
आयुष्यमान कार्ड - २१
मतदार नोंदणी - १२७
मुळशी
जातीचे दाखले - १६
उत्पन्न दाखले - ३१७
अधिवास दाखले - २५
शिधापत्रिका- ७५
आधार जोडणी -९
सातबारा उतारे - ५८०
फेरफार - ९७
आयुष्यमान कार्ड - ६
ई- सेवा प्रत - १५५
शेतकरी कार्ड - ८
डीबीटी - ५
वारस ठराव - ७
पिंपरी चिंचवड
उत्पन्न दाखले - ३२०
अधिवास दाखले- १६
शिधापत्रिका - १६३
आधार कार्ड - १८४
सातबारा उतारे - ७७
फेरफार - १०
वारस प्रकरणे - २५
लोणी काळभोर
जातीचे दाखले - ४
उत्पन्न दाखले - ७४
अधिवास दाखले - ४२
नॉन-क्रिमीलेअर - १२
शिधापत्रिका - ४०
संजय गांधी योजना- २०
हवेली :
जातीचे दाखले- १८
उत्पन्न दाखले- ३१४,
अधिवास दाखले - ७
शिधापत्रिका - ३५
आधार कार्ड- ७६
सातबारा उतारे - १२५२
फेरफार - १६
आयुष्यमान कार्ड - १४
ई-सेवा प्रत - २९८
वारस ठराव - ६
पुणे शहर :
उत्पन्न दाखले - ८०
अधिवास दाखले - ३०
नॉन-क्रिमीलेअर - २५
आधार कार्ड - ३०
भोर
शिधापत्रिका - १०८
आधार कार्ड - ७३
संजय गांधी योजना - ४७
विविध दाखले - ४४१
ॲग्रीस्टॅक नोंदणी - ९०
वेल्हा (राजगड)
शिधापत्रिका - ५९
आधार कार्ड - ७२
संजय गांधी योजना - ७७
विविध दाखले - १६४
ॲग्रीस्टॅक नोंदणी - २९
इंदापूर
उत्पन्न दाखले - १४५
शिधापत्रिका - ७६
सातबारा उतारे - २८९
फेरफार - २८
बारामती :
जातीचे दाखले- ३४८
उत्पन्न दाखले- ११८०
अधिवास दाखले -२९५
नॉन-क्रिमीलेअर - १४०
शिधापत्रिका - ४२६
आधार कार्ड - ७६८
संजय गांधी/श्रावण बाळ - २२०
सातबारा उतारे- ८१०
क.जा.प - १५
प्रधानमंत्री आवास योजना - ८३३
दौंड :
जातीचे दाखले - २११
उत्पन्न दाखले - ३४१
अधिवास दाखले -२४२
नॉन-क्रिमीलेअर - २०२
आधार कार्ड - ३९
संजय गांधी/श्रावण बाळ - ३६
प्रधानमंत्री आवास योजना - १०
क.जा.प - ४
पुरंदर ः
जातीचे दाखले - ८०
उत्पन्न दाखले- २४२
अधिवास दाखले - २९
नॉन-क्रिमीलेअर - २८
शिधापत्रिका - ९३
आधार कार्ड - ८१
संजय गांधी/श्रावण बाळ - ९०
प्रधानमंत्री आवास योजना - १०
क.जा.प - ४
दृष्टीक्षेपात अभियानात
मावळ : लोणावळा येथील व्ही.पी.एस. हायस्कूल येथे ३३५ अधिवास अर्ज.
मुळशी : सर्वाधिक ५८० सातबारा उतारे वितरित.
हवेली : सर्वाधिक १२५२ सातबारा फेरफार नोंदींसह कामकाज.
बारामती : सर्वाधिक ११८० उत्पन्न दाखले आणि ७६८ आधार कार्ड तयार.