पुणे

बोगस निविष्ठांवर करडी नजर

CD

काटेवाडी, ता. ११ : खरीप हंगाम २०२५मध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळावीत, यासाठी जिल्हा कृषी विभागाने कठोर पावले उचलली आहेत. बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी तालुकास्तरावर १३ आणि जिल्हास्तरावर २, अशा एकूण १५ भरारी पथकांनी तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेदरम्यान गंभीर अनियमितता आढळलेल्या १० वितरकांचे परवाने निलंबित केले असून, यामध्ये खतांचे ५, कीटकनाशकांचा १ आणि बियाण्यांचे ४ परवाने समाविष्ट आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली.
कृषी विभागाने केलेल्या तपासणीत अनेक अनियमितता उघड झाल्या. काही वितरकांनी विक्री परवान्यामध्ये उगमपत्राचा समावेश न केल्याचे, जादा दराने विक्री केल्याचे, नोंदणी प्रमाणपत्रांचे वेळेत नूतनीकरण न केल्याचे, शिल्लक साठा आणि दरपत्रक दर्शनी भागात न लावल्याचे, तसेच शेतकऱ्यांना पक्की बिले न दिल्याचे आढळले. या सर्व बाबी बियाणे अधिनियम १९६६, खत (नियंत्रण) आदेश १९८५ आणि कीटकनाशके अधिनियम १९६८ यांचे उल्लंघन करणाऱ्या असल्याने संबंधित वितरकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

बोगस निविष्ठांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आणि पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यासाठी आम्ही तालुका आणि जिल्हास्तरावर भरारी पथकांमार्फत सतत तपासणी करत आहोत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आणि खरेदी करताना पक्की पावती घेण्याचे, तसेच साठ्याची वैधता आणि दरपत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. बोगस निविष्ठांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
- संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक

तक्रारी नोंदविण्याचे आवाहन
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे, यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची पुनर्रचना केली आहे. ही समिती बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या निकृष्ट दर्जा, अवाजवी दराने विक्री, साठेबाजी किंवा पावती न देण्याच्या तक्रारींचे ८ दिवसांत निराकरण करेल. शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: दुबईहून 'हॉटसीट'...! Ravi Shastri असं काही म्हणाले, ज्याने पाकिस्तानच्या बुडाला लागली आग, Video

Dussehra Melava 2025 Live Update : थोड्याच वेळात मनोज जरांगेंचा दसरा मेळावा, रुग्णवाहिकेतून रवाना...

बेस्ट फ्रेंडचा प्रेमसंबंधाला नकार, माझी नाही तर कोणाचीच नाही म्हणत संपवलं; १७ वर्षीय तरुणीच्या हत्येचा उलगडा, तरुणाला अटक

Karnataka Politics : नेतृत्व बदलाची चर्चा; मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं, ‘पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार’

Nashik Saraf Bazar : सोन्याचे दर लाखांवर, तरीही गुंतवणुकीचा उत्साह कायम! दसऱ्याच्या मुहूर्तावर सराफ बाजार 'झळाळला'

SCROLL FOR NEXT