पुणे

बारामतीमध्ये लंपी प्रतिबंधात्मक ९४ हजार पशुधनांचे लसीकरण

CD

काटेवाडी, ता. १८: बारामती तालुक्यात लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आहे. तालुक्यात आज अखेर ९४ हजारांहून अधिक पशुधनांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे. लंपी आजारसदृश्य लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय पोळ यांनी केले आहे.

तालुक्यात एकूण एक लाख २० हजार २६१ गोवर्गीय पशुधन असून त्यापैकी ९४ हजार ७०७ इतक्या पशुधनांचे लसीकरण करण्यात आले आहे, उर्वरित पुशधंनाना लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे. लंम्पी आजाराग्रस्त जनावराची संख्या एकूण ४६ असून उपचाराअंती बरे झालेली ३१ तर ४ जनावरांचा मृत्यू झाला आहे तसेच उर्वरित ११ जनावरांवर उपचार सुरू आहेत. दवाखान्यात २० हजार लसीचा साठा उपलबध् असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यासोबतच त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येत आहे.


‘प्रतिबंधक औषधांचा वापर करा’
निरोगी जनावरांचे लसीकरण, गोठ्यातील स्वच्छता व पाण्याची डबकी असल्यास कीटकनाशकांची फवारणी, गोचीड प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. अधिक माहितीकरिता पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय पोळ आणि पशुधन पर्यवेक्षक राहुल हगारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
01256

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : श्रद्धा कपूरचा भाऊ सिधांत कपूर ड्रग्ज चौकशीत; मुंबई पोलिसांचे समन्स

"मुलगा-मुलगी भेद नाही हे आपण शिकवलं पाहिजे" मराठी अभिनेत्रीने मांडलं मत; पालकत्वावर म्हणाली...

CJI Surya Kant यांच्या पहिल्या खटल्यात धक्कादायक क्षण! वकीलाचा अचानक आवाज गेला, courtroom मध्ये नेमकं काय घडलं?

प्राजक्ता माळी सध्या करते? गावाकडची विहीर आणि चिमूकल्यांची कबड्डी, नवी सिरियल की आणखी काही

Sex vs Rape Supreme Court : सहमतीने सेक्स आणि बलात्काराचा गुन्हा..! अखेर सुप्रीम कोर्टाने फरक सांगत दिला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT