पुणे

पाणीपुरवठा सुनिश्चितीसाठी समन्वयक अधिकारी नेमा

CD

काटेवाडी, ता. २२ : हर घर जल-जलजीवन मिशनअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १,८३६ ग्रामपंचायती आणि ९,३३५ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. शाश्वत पाणीसाठा, वीज जोडणी आणि प्रलंबित कामांना गती देण्यावर विशेष भर देत प्रत्येक वाडी, शाळा आणि अंगणवाडी पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठक सोमवारी (ता. १८) पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करताना शाश्वत पाणीसाठा, जागेची उपलब्धता, सोलर प्रकल्प आणि यंत्रणेचा विचार करावा. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधावा आणि पूर्ण झालेल्या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित कराव्यात. महावितरणने वीज जोडणी तातडीने करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. अटल भूजल योजनेसाठी पाण्याच्या शाश्वत स्रोतांचा समावेश असलेला आराखडा सादर करावा आणि जिल्हा भूजल विकास यंत्रणेने स्थळ पाहणी करून स्रोतांची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जागेच्या प्रलंबित समस्यांवर स्थानिक पातळीवर तोडगा काढण्यासाठी यंत्रणेने पाठपुरावा करावा. जगजीवन मिशनअंतर्गत कामे गतीने पूर्ण करण्यासाठी समन्वय ठेवणे आवश्यक आहे. बैठकीत प्रगतिपथावरील कामे, जागा आणि वीज जोडणीच्या अडचणी, तसेच प्रस्तावित कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. ही योजना प्रभावीपणे राबविल्यास पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: रेल्वे स्थानकात महिलेची पतीला मारहाण, मनसेची महिला कार्यकर्ता संतापली, महिलेला कार्यालयात बोलवलं अन्...; व्हिडिओ व्हायरल

IND vs WI 2nd Test: भारताकडून वेस्ट इंडिजला फॉलोऑन, पण जॉन कॅम्पबेल - शाय होपच्या अर्धशतकांनी पाहुण्यांना सावरलं

Best Places to Visit Diwali 2025: एक सण, सहा अनोख्या परंपरा; यंदाच्या दिवळीत द्या भारतातील या ठिकाणांना भेट

Bhau-Beej Recipes: भाऊबीजेचा आनंद करा डबल; तुमच्या भावंडांसाठी बनवा गाजर-अंजीर हलवा आणि पीज-टोमॅटो पुलाव, लगेच नोट करा रेसिपी

Latest Marathi News Live Update: अजित पवारांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, यावर जगतापांनी बोलणं टाळलं

SCROLL FOR NEXT